मुंबई | राज्यातील वातावरण सध्या चांगलंच तापलेलं दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये आ.रोप-प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे. अशातच मनसुख हिरेन यांचा मृ.तदेह सापडल्याने राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यातील विरोधी पक्षनेत्यांकडून मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणीअनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याचबरोबर ठाकरे सरकारवरही निशाणा साधला जात आहे.अशातच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.
मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल ना?, असा सवाल चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला केला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट देखील केलं आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले. कधी कुणी सेलिब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी आणि आता मनसुख हिरेन. प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य आहे, आणि रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणाऱ्या गोष्टी, असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तसेच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचं अधिवेशन सुरु असतानाच एका महत्वाच्या प्रकरणातील साक्षीदाराचा संशयास्पद मृ.त्यू होणं, हे ध.क्कादायक आहे. त्यामुळं हे प्रकरण नक्की काय आहे?, हे बाहेर यायलाचं हवं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मनसुख हिरेन यांची ह.त्या झाली की त्यांनी आ.त्मह.त्या केली, याविषयी जनतेच्या मनात शंका आहे. या शंकेचं निरासरन झालं पाहिजे. पण त्यांच्या मृ.त्यूचं कोणीही भांडवल करु नये, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला.
दरम्यान, 25 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश आंबानीच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडून आल्याने तपास यंत्रणा अर्लट झाली होती. क्रा.ईम ब्रांचनं त्याचा तपास केला असता, आज सकाळी मुंब्र्यातल्या खाडीत त्या गाडीमालकाचा मृ.तदेह सापडला. गाडीमालकाचं नाव मनसुख हिरेन असं आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात असे अनेक मृत्यू झाले
कधी कुणी सेलीब्रीटी तर कधी कुणी एखादी मुलगी
आणि
आता मनसुख हिरेन…
प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य…..
आणि
रहस्यातून बाहेर पडताहेत अनेक धक्कादायक मती गुंग करणार्या गोष्टी…….सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना…?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 5, 2021
महत्वाच्या बातम्या-
जाणून घ्या! बीट खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे
आयकर विभागाच्या छापेमारीनंतर तापसी पन्नूची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली….
मनसुख हिरेन मृ.त्यूप्रकरणी शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पाठवणीवेळी खूप रडणं नवरीला पडलं महागात, घडली ‘ही’ ध.क्कादायक घटना
सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची घसरण, पाहा काय आहेत आजचे दर