नवी दिल्ली | मागील काही महिन्यांमध्ये कमी झालेली कोरोना (Corona) रूग्णसंख्या आता पुन्हा वाढली आहे. भारतात तिसऱ्या लाटेला (Third Wave) सुरूवात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
अशातच आता ओमिक्राॅनचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. त्यामुळे आता देशात पुन्हा लाॅकडाऊन (Lockdown) लागणार का? अशी चर्चा मागील 8-10 दिवसांपासून सुरू होती.
अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाॅकडाऊनच्या बाबतीत मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
पॅनिक होऊ नका, पण पूर्णपणे खबरदारी घ्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी देशात लाॅकडाऊनच्या शक्यतांना देखील पुर्णविराम दिला आहे.
भारताची लढाई गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे, परिश्रम एकमात्र आपले ध्येय आहे. आपण 130 भारतीय लढा देत आहोत. ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याचं देखील मोदी म्हणाले आहेत.
भारत सध्या 3 कोटी किशोरवयीन मुलांचं लसीकरण पूर्ण होत आहे. आरोग्य सेवकांना जितक्या लवकरच बुस्टर डोस लागेल ते चांगलं आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.
काही घरगुती उपचार असतात जसं आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे. सर्दी खोकल्यावर काढा दिला जातो, त्याचा वापर या हंगामात केला पाहिजे, असंही मोदी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
कोण आहे ही ‘बिकिनी गर्ल’??? काँग्रेसने दिलंय थेट आमदारकीचं तिकीट
समांथासोबतच्या घटस्फोटावर नागाचैतन्यचा मोठा खुलासा, म्हणाला…
5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग
श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक