भाजप-मनसे युती होणार?, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

नागपूर | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्वलंत हिंदूत्वाची शाल पांघरल्यानंतर आता राज्यात भाजप-मनसे युतीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी हिंदूत्वाचा मुद्दा मांडत आक्रमक सभा घेतल्या.

राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची बुस्टर डोस सभा होणार आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि फडणवीस महाविकास आघाडी सरकारला फैलावर घेणार असल्याचं चित्र आहे.

त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजप यांच्यात युती होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.

राज ठाकरेंनी आमच्या भूमिकेशी साम्य असलेली भूमिका घेतली आहे. हिंदुत्व, आणि लाऊडस्पीकर असो या भाजपच्या भूमिका राहिल्या आहेत. मात्र मनसे आणि भाजपच्या प्रतिक्रिया अपरिपक्व आहेत, असं फडणवीस म्हणाले आहेत.

आमची अशी कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही, असं म्हणत फडणवीसांनी मनसे भाजप युतीवर फुल स्टाॅप लगावला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, नागपूरात बोलताना फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरून महाविकास आघाडीवर निशाणा देखील साधला.

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतूक करणार नाहीत”

“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार” 

‘…तर कुणी मानसिक रोगी’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला 

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ 

“तुम्हाला कळत नसेल तर अजित पवारांना विचारा…”; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना टोला