भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने होणार का?; सौरव गांगुली म्हणतो…

नवी दिल्ली | क्रिकेट हा खेळ सध्या जगभर अधिक लोकप्रिय होत चालला आहे. भारताला क्रिकेटचा ब्रॅंड अम्बेसेडर म्हटलं जातं. कारण भारतात जगातील सर्वात जास्त क्रिकेटचे चाहते आहेत.

जागतिक क्रिकेटच्या कमाईत भारताचा म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा वाटा तब्बल 80 टक्के आहे. परिणामी भारताच्या सामन्यांवर आयसीसीचं अधिक लक्ष असतं.

क्रिकेटमधील सर्वाधिक पाहिला जाणारा सामना हा भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा असतो. पण भारत आणि पाकिस्तानदरम्यान सध्या आयसीसीच्या स्पर्धा सोडता इतर सामने होत नाहीत.

नुकतंच जागतिक टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा युएईत पार पडली आहे. साखळी फेरीदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला होता. हा सामना विश्वचषकातील सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी जगभरातून क्रिकेट रसिक सामन्याला उपस्थिती दर्शवत असतात. याचाच विचार करून विविध स्तरातून भारत आणि पाकिस्तानदरम्यान मालिका खेळवण्याची मागणी केली गेली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान द्विपक्षीय मालिका खेळवण्याबाबत बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीशी चर्चा केल्याचं वक्तव्य केलं होतं.

रमीझ राजा यांच्या या वक्तव्यावर सौरव गांगुली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन देशातील क्रिकेट सामने सुरू करणे हे क्रिकेट बोर्डाच्या हातात नाही. दोन्ही सरकारनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचे असल्याचं गांगुली यांनी म्हटलं आहे.

दोन्ही देशांमधील क्रिकेट कित्येक वर्षांपासून थांबलं आहे. यावर दोन्हीकडील सरकारने काम करायला हवं, असं वक्तव्य सौरव गांगुली यांनी केलं आहे. परिणामी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेसाठी क्रिकेट रसिकांना अजुन बराच काळ वाट पहावी लागणार आहे.

दोन्ही देशांतील क्रिकेट सुरू करणं हे माझ्या किंवा रमीझ राजा यांच्या हातातील नाही, असं स्पष्टपणे गांगुली म्हणाले आहेत. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना हा क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असते.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानदरम्यान 2012-13 मध्ये शेवटची मालिका खेळवण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही देशांतील वातावरण बिघडल्यानं क्रिकेट सामने न खेळवण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

 ‘दंगलीचा कट भाजपच्या ‘या’ नेत्याने रचला’; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

राज्यात मुसळधार पावसाचं सावट! ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी

‘बाबासाहेब मला नेहमी म्हणायचे…’; राज ठाकरे यांची भावूक पोस्ट

 “धमकी देऊन न्याय मिळत नाही, न्यायालयात आपली बाजू मांडा”

‘तुटेल एवढं ताणू नये’; शरद पवारांचा राज्य सरकारला सूचक सल्ला