राज्यात लॉकडाऊन होणार का?, राजेश टोपे म्हणाले…

मुंबई |  मागिल वर्षाप्रमाणे याहीवर्षी कोरोना रोगाने थैमान घालायला सुरूवात केली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढालं आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्या सरकारकडून लॉकडाऊनचा इशारा दिला जात आहे. परंतू यावरून राज्यात अनेक प्रकारच्या चर्च्यांना उधाण आलं आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वक्तव्य केलं आहे.

लॉकडाऊन हा मुख्यमंत्र्यांनाच काय राज्यातील कोणत्याही व्यक्तिला नकोच आहे. मात्र तशी वेळ आल्यास नाईलाजाने का होईना लॉकडाऊनचा पर्याय वापरावा लागेल. कारण माणसांच्या जीवापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नसते, असा स्पष्ट इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे. राजेश टोपे यांनी मंगळवार 30 मार्च रोजी मुंबईत ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधला.

लॉकडाऊन हा कोणालाही प्रिय नसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही तशी  इच्छा नाही. महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीला पुन्हा लॉकडाऊन लागावा, असं वाटतं नाही. परंतू आपल्याकडे ‘तहान लागल्यावर विहीर खोदायची’ अशी एक म्हण आहे. तशी परिस्थिती आपल्यावर ओढवू नये म्हणून आपण तयारी करत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

त्याचप्रमाणे राज्यात दररोज जवळपास 35 ते 40 हजार कोरोनाबाधित रूग्णांची नोंद होत असेल, तर तशी बेड्सची व्यवस्था आहे का, हे पाहावं लागेल, असंही ते म्हणाले आहेत. राज्यात परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनसारखा पर्याय वापरावा लागणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं.

तसेच लॉकडाऊनच्या निर्णयावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत का, असा सवालही राजेश टोपे यांना वचारण्यात आला होता. त्यावेळी महाविकास आघाडीत लॉकडाऊनच्या निर्णयावरून कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

आज सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त, जाणून…

लॉकडाऊनबाबत नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिला…

‘अन्यथा रुग्णालये ताब्यात घेणार’; ठाकरे सरकारचा…

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संंख्येमुळे पुण्याच्या महापौरांनी…

चोरी करायला गेला पण एसीची हवा पाहून तिथेच पहुडला, सकाळी…