मनसे-भाजप युती होणार का?, आशिष शेलार यांनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई | मागील दीड वर्षापासून भाजप आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये युतीची चर्चा सुरू होती. अनेकदा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी देखील झाल्या आहेत.

गुडीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची कास धरत भाजप सोबत युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील युतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. अशातच भाजप आमदार आशिष शेलार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कोल्हापुरात बोलताना आशिष शेलार यांनी राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यातील भेटीमागील स्पष्टीकरण दिलं आहे.

मनसेसोबत युती केली जाणार नाही. पण मुंबई महापालिकेत स्वबळावर भाजपची सत्ता आणू, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी संजय राऊतांवर देखील टीकास्त्र सोडलं आहे.

स्थानिक पोलिस सीबीआयला धमकी देत असल्याचं सांगितलं आहे. याची संजय राऊतांचा लाज वाटली पाहिजे, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

Russia-Ukrain War: भय इथले संपत नाही, बाह बुका शहरातील धक्कादायक प्रकार समोर

 OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर; पहिल्याच दिवशी मिळवा ‘इतक्या’ हजारांचा बंपर डिस्काऊंट

 ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

  “पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”

  लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय