पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेतासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावर अजित पवार म्हणतात…

सातारा :  उस्मानाबामधील राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या. या चर्चांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. 

राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. मात्र या केवळ बातम्याच आहेत, त्यात काही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. 

एखाद्या उमेद्वाराने अर्ज भरला नाही याचा अर्थ तो पक्षासोबत नाही असा होत नाही. त्यामुळे काहीही तर्क वितर्क लावू नका. मलासुद्धा काही काळ बारामतीमधून अर्ज भरता आला नाही, याचा अर्थ असा लावायचा का?, असा सवालही त्यांनी यावेळी केला

राणा जगजितसिंह पाटील पाटील भाजपमध्ये जाणार का ? यासंदर्भात त्यांच्या पत्नी आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती अर्चना पाटील यांनी असं काहीही ठरलं नाही आणि या बातम्यांंमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी उमेदवारांंच्या निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणं सुरु केलं आहे. यासाठी अजित पवार आज सातारा दौऱ्यावर होते. 

महत्वाच्या बातम्या-

-निष्ठावंतांना डावललं तर वेगळा विचार करु; ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

-साताऱ्यातून ‘हा’ उमेदवार विधानसभा निवडणूक लढवेल; अजित पवारांनी जाहीर केलं नाव

-शरद पवार माझ्या ह्रदयात असतील तर उद्धव आणि आदित्य यांचं बळ अंगात असेल- सचिन अहिर

-मी काटे मोडत नाही तर, फक्त घड्याळाला चावी देतो- उद्धव ठाकरे

-सचिन अहिरांनी ‘राम राम’ करताच राष्ट्रवादीकडून ‘या’ नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड!

IMPIMP