मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बॉलिवूडचं हे सुपर हॉट कपल अनेकांचं फेवरेट आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. या कपलच्या नात्याविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सतत रंगत असतात.
मलायका आणि अर्जुन लग्न करणार असल्याच्या अफवा अनेकवेळा पसरल्या. अशातच आता पुन्हा एकदा या कपलच्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. अर्जुन कपूरने शेअर केलेल्या एका फोटोमुळे अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच एक फोटो शेअर केला आहे. अर्जुनने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्या हातात एक मंगळसूत्र दिसत आहे. अर्जुनच्या हातातील हे मंगळसूत्र पाहूनच नेटकाऱ्यांनी अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाविषयी चर्चा पुन्हा सुरू केल्या आहेत.
हे मंगळसूत्र मलायकासाठी तर नाही ना? असा सवाल नेटकरी विचारत आहेत. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी जरी अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू केल्या असल्या तरी देखील या फोटोबर आपलं पर्सनल कनेक्शन असल्याचं अर्जुनने या फोटोला कॅप्शन देत म्हटलं आहे.
या फोटोवर कॅप्शन देत अर्जुन म्हणाला की, ‘की अँड का’ या चित्रपटाच्या आठवणीती हा फोटो आहे. या चित्रपटाचा सेट आणि की दोघांनाही मी मिस करत आहे. मी माझ्या आईच्या इच्छेखातर हा चित्रपट स्वीकारला होता.
ही माझी एक खासगी बाब आहे. बेबो आणि बालकी सरांसोबत काम केल्यावर ती अधिक खासगी झाली आहे. मला वाटतं या चित्रपटाचा दुसरा भाग पण तयार करायला हवा. काय म्हणतेस करीना कपूर?, असा सवाल देखील अर्जुनने केला आहे.
दरम्यान, नुकतंच मलायका तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याच्यासोबत एका पार्टीमध्ये दिसली होती. या पार्टीत मलायकाने रेड शॉर्ट आणि ट्रॅक जॅकेट घातले होते. तर अर्जुन कपूरने कॅज्युअल ब्लॅक टी-शर्ट घातले होते. पार्टीतील या दोघांच्या लुकमुळे सर्वांचाच नजरा त्यांच्यावर खिळून होत्या.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
सलाम! हॉस्पिटलला आग लागली तरी देखील डॉक्टर रुग्णाची सर्जरी करतच राहिले; पाहा व्हिडीओ
सोने पे सुहागा! ऐन लग्नाच्या सिझनमध्ये सोनं आणखी उतरलं; वाचा आजचा दर
535 भागांचा टप्पा पूर्ण करून ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
लाईव्ह कार्यक्रमातच गेस्टवर पडला टीव्ही स्टुडिओचा सेट, पुढे…