उदयनराजे राष्ट्रवादीत जाणार? म्हणाले, “आज राजेशाही असती तर…”

मुंबई | खासदार उदयनराजे यांनी आज पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

अजित पवारांशी भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी माध्यामांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्यासह विकास कामांवर बोलणं झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयावर उदयनराजे यांनी भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी समिश्र प्रतिक्रिया दिली आहे.

प्रत्येकाचे वैयक्तिक जीवन असतं. प्रत्येक व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर काय करायचं आणि काय करायचं नाही. हे त्या व्यक्तिने ठरवायचं असतं, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

लोकशाहीमध्ये निवडून झालेले नेत प्रतिनिधी याचं उत्तर देतील. राजेशाही असती तर मी उत्तर दिलं असतं, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे राजे पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का?, अशी चर्चा होती. त्यावर देखील उदयनराजे यांनी उत्तर दिलंय.

छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण होते सर्वधर्म समभाव तसे माझे धोरण सुद्धा सर्वपक्षिय समभाव असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, अजित पवार आणि उदयनराजे यांच्या भेटीमुळे आता आगामी काळात साताऱ्याच्या राजकारणात काय बदल होतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

‘या’ महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपणार; ICMR ने दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर…” 

काळजाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणाचं गूढ उकललं! 

“राज्यात सत्ता आमचीच तरी नितेश राणेंसाठी सॉफ्ट कॉर्नर दाखवला”