मुंबई | अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. बॉलिवूडमधील या दोन्ही बड्या कलाकारांनी आपलं नातं पुढे घेऊन जात साखरपुडा उरकल्या असल्याच्या चर्चा बुधवारी माध्यमांमध्ये रंगल्या होत्या.
तसेच या दोघांचा रोका झाला आहे आणि हे दोघे आता अधिकृतपणे नात्यात अडकले आहेत, असा दावा देखील काही माध्यमांनी केला होता. मात्र, आता कॅटच्या टीमने यावर खुलासा करत चर्चांणा पूर्णविराम दिला आहे.
कतरिनाच्या टीम प्रवक्त्याने झूम एंटरटेनमेंटला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने विकी कौशल आणि कॅटच्या साखरपुड्याच्या वार्ता या निवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. यानंतर चाहत्यांमध्ये कतरिना आणि विकीच्या नात्याबद्दल पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
कतरिना आणि विकीचा साखरपुडा झालेला नाही. तसेच रोका सेरमनी देखील झाली नाही. या केवळ अफवा आहेत, असं कतरिना कैफच्या टीममधील या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे. विकी कौशलने मात्र अद्याप यावर मौन बाळगलं आहे. त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कतरीना लवकरंच ‘टायगर 3’ चित्रपटाच्या शुटींगसाठी रवाणा होणार असल्याचं देखील यावेळी प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे. कॅट लवकरंच अभिनेता सलमान खानसोबत शुटींगसाठी रशियाला जाणार आहे.
दरम्यान, माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी विकी कौशलला बऱ्याचवेळा कॅटच्या बिल्डिंगबाहेर कैद केलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच हे दोन्ही कलाकार ‘शेरशाह’ च्या स्क्रिनिंगवर स्पॉट झाले होते. अनेकदा हे दोघे एकत्र दिसले आहेत. मात्र, अद्याप या दोघांनी आपल्या नात्याविषयी काहिही खुलासा केला नाही.
सध्या हे दोन्ही कलाकार शुटींगमध्ये व्यस्त आहेत. कतरिना टायगर 3 च्या शुटींगमध्ये तर विकी कौशल ‘अश्वतथामा’च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यामुळे या दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चा निवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘कोणीतरी आम्हाला वाचवा!’; अमेरिकन सैन्यापुढे अफगाणी महिलेचा आक्रोश, पाहा व्हिडीओ
‘या’ अभिनेत्रीच्या मोहक रूपानं चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो
धाडस करत चक्क तरूणीने पकडला भला मोठा साप; होतयं सोशल मीडियावर कौतुक, पाहा व्हिडीओ
भर लग्न मंडपात तरूणीने नवरदेवाला चांगलाच बदडला, पाहा व्हायरल व्हिडीओ