फक्त 10 मिनिटं भेटशील का?’ चाहत्याच्या प्रश्नावर कियरानं दिलं उत्तर, म्हणाली…

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियावरून सतत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती वारंवार फोटो किंवा व्हीडिओ आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर करत असते.

कियाराचे खूप फॅन्स आहेत. तिची एक झलक बघायला कित्येकांची रांग लागलेली असते. यापैकी एका चाहत्यानी तिला चक्क दहा मिनिटं भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यासंदर्भात त्या चाहत्याने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं होतं.

त्यात तो म्हणाला की, ‘कियारा मॅडम माझ्या आदर्श आहेत. त्यांना भेटणं माझ्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा क्षण असेल. ते माझ्यासाठी माझं स्वप्न पूर्ण होण्यासारखं असेल. या वेळेस कियारा मॅडम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीला आल्या होत्या पण मी त्यांना भेटू शकलो नाही. पण पुढच्या वेळेस मी त्यांना नक्की भेटेन. माझं स्वप्न लवकरचं पूर्ण होईल अशी आशा करतो. मॅडम मला तुम्हाला भेटायचं आहे.’

त्याच्या या विनंतीला कायराने उत्तर दिलं आहे.’स्वप्न पूर्ण सुद्धा होतात आणि होतील, लवकरच’ असं उत्तर तिनी दिलंं. तिनी दिलेलं उत्तर पाहून त्या चाहत्याला आनंदाचा ध.क्का बसला.

त्याने कायराने केलेलं हे ट्विट पुन्हा रिट्विट करत म्हणाला की, ‘तुमची प्रत्येक प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. कियारा मॅडम माझ्याकडे तुमचे प्रत्येक ट्विट सेव्ह आहेत जे तुम्ही लाईक केलेले आहेत.’

दरम्यान, बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी दरवर्षी त्याचं नवीन सेलिब्रिटी कॅलेंडर प्रकाशीत करत असतो. कियाराने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केलं आहे. हा फोटो कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तसेच , अलिकडेच तिची मुख्य भूमिका असलेल्या ‘गिल्टी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चिपटामध्ये ती ‘नानकी’ ही भूमिका साकारत असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

सिनेसृष्टीला मोठा धक्का: प्रेक्षकांना पोट धरुन हसवणाऱ्या…

फँड्रीतील शालूचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर…

आता हेच ऐकायचं राहिलं होतं! ‘सरकारने सर्वात आधी…

कार्तिक आर्यनचा उद्धटपणा आला अंगाशी, करण जोहरनं धर्मा…

जाणून घ्या! कोरोनाची आणखी दोन नवीन लक्षणं