खेळ

भारताच्या पराभवानंतर न्यूझीलंडच्या कर्णधाराची मनं जिंकणारी प्रतिक्रिया; म्हणतो…

लंडन | आयसीसी विश्वचषक 2019 च्या पहिल्या सेमिफायनलमध्ये 18 धावांनी विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनने भारतीय संघाबद्दल महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

सेमिफायनलमध्ये भारतीय संघ अडचणीत आला असतानाही इतर खेळाडूंनी शेवटपर्यंत सामन्यात आपलं आव्हान कायम ठेवलं. यामुळेच भारतीय संघ जगातील सर्वोत्कृष्ट संघ आहे, असं विल्यमसनने म्हटलं आहे. विल्यमसनच्या या प्रतिक्रियेनंतर त्याने अनेक क्रिकेट रसिकांची मनं जिंकली आहेत. 

240 ते 250 या धावसंख्येवर आम्ही भारतावर दबाव आणू असा विचार केला होता. आणि आमच्या खेळाडूंनी हे करून दाखवलं, असं विल्यमसनने सांगितलं आहे.

आम्हाला जागतीक स्तरावरील फलंदाजांवर दबाब आणून खेळपट्टी संथ झाल्यानंतर त्याचा फायदा घ्यायचा होता. मात्र भारत जगातील सर्वोत्कृष्ट संघ का आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे, अशा शब्दात विल्यमसनने भारतीय संघाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 

IMPIMP