Winter Child Care Tips l हिवाळ्यात लहान मुलांना आंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती?

Winter Child Care Tips l सध्या सर्वत्र थंडी जास्त प्रमाणात आहे. अनेक राज्यांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली गेले आहे. त्यामुळे सकाळी सकाळी घराबाहेर देखील पडू वाटत नाही. अशा परिस्थितीत ज्यांच्या घरात नवजात बाळ जन्माला आले आहे त्यांच्यासाठी हा हिवाळा खूप कठीण आहे. कारण लहान मुलाचे थंडीपासून संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. कारण वाढत्या थंडीमुळे अनेकवेळा सर्दी, खोकल्यासारख्या आजाराला बळी पडू शकतात. त्यामुळे सकाळच्या वेळी लहान मुलांना अंघोळ घालणे हे देखील आजारपणाचे कारण बनू शकते. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात की, हिवाळ्यात मुलांना आंघोळ करण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती आहे जेणेकरून तुमची मुले वारंवार आजारी पडू नयेत.

Winter Child Care Tips l मुलांच्या अंघोळीची वेळ निश्चित करा :

हिवाळ्यात, नवजात बाळाला आंघोळ घालण्यासाठी दुपारी 12:00 पर्यंतची वेळ ठेवा. मजणेच 11 ते 12 किंवा 1:00 च्या दरम्यान मुलांना आंघोळ घालण्याचा प्रयत्न करा. कारण त्यावेळी सूर्यप्रकाश असेल (Winter Child Care Tips) आणि आंघोळ केल्यानंतर त्यांना सूर्यप्रकाशात बसता येईल.

यावेळी मुलांना आंघोळ घालू नका :

जर तुमचे मूल खूप लहान असेल, तर बाळाला खाऊ घालण्याच्या वेळी किंवा झोपण्याच्या वेळी कधीही आंघोळ घालू नका. कारण असे केल्याने मुलाची चिडचिड होते आणि तुम्ही मुलाला नीट आंघोळ घालू शकत नाही.

मुलांसाठी आंघोळीसाठी एक नित्यक्रम तयार करा :

लहान मुलांसाठी दिनचर्या असणे खूप महत्वाचे आहे. कारण मूल त्याच्या शरीराला त्यानुसार अनुकूल करते. मुलांना नेहमी एकाच वेळी आंघोळ घाला. जेव्हा दिवसभरात तापमान जास्त असते तेव्हा मुलांना आंघोळ घालण्याचा प्रयत्न करा, मुलांना सकाळी लवकर आणि दुपारी 2:00 नंतर आंघोळ घालणे टाळा. (Winter Child Care Tips)

Winter Child Care Tips l पाण्याचे तापमान तपासा :

हिवाळ्यात मुलांना आंघोळीसाठी पाण्याचे योग्य तापमान असणे फार महत्वाचे आहे; पाणी जास्त गरम किंवा खूप थंड नसावे. तुम्ही तुमच्या मुलांना नेहमी कोमट पाण्याने आंघोळ घालावी आणि आंघोळ केल्यानंतर लगेच त्यांना कपड्याने पुसावे. तसेच त्यांना कपडे घाला आणि त्यांना थोड्या उबदार ठिकाणी घेऊन जा.

News Title : Winter Child Care Tips

महत्वाच्या बातम्या :

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील

Pune Tourist Places l या प्रजासत्ताक दिनी पुण्यातील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Manoj Jarange Live l मनोज जरांगेंनी सरकारला दिला इशारा! तोडगा निघाला नाही तर…

Republic Day l प्रत्येक भारतीयाला ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यामध्ये काय फरक असतो माहीत असायलाच हवा!

Shiva Balakrishna Arrests l धाड टाकण्यासाठी गेलेलं ACB पथक अधिकाऱ्याचा बंगला पाहूनच थक्क! 40 लाख, 40 आयफोन,व्हिला सह मिळालं मोठं खबाड