Winter Health Tips l सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी आहे. अशा परिस्थिती त्वचा कोरडी आणि खाज सुटण्याबरोबरच हातावर आणि विशेषत: पायाच्या बोटांवर लाल खुणा दिसू लागतात आणि खाज सुटण्यासोबत सूज येऊ लागते. हिवाळ्यात अशा प्रकारची समस्या होणे सामान्य आहे. पण यामुळे तुम्हाला काही वेळा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पण असे काही उपाय आहेत जे तुम्हाला घरच्या घरी या समस्येपासून आराम मिळवून देऊ शकतात. चला तर मग आपण आज घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊयात ज्यामुळे सूज आणि खाज येण्यापासून आराम मिळतो.
मीठ :
हिवाळ्यात हात-पायांच्या सुजेपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात मीठ मिसळा आणि त्यात पाय 10 ते 15 मिनिटे ठेऊन बसा. पाण्याच्या उबदारपणामुळे वेदना कमी होतात. हे लक्षात ठेवा दिवसातून जास्त वेळा असे करू नका कारण गरम पाण्यामुळे पायांच्या त्वचेत कोरडेपणा येऊ शकतो. (Winter Health Tips)
Winter Health Tips l गरम तेल मालिश :
एका कपमध्ये थोडे ऑलिव्ह, खोबरेल किंवा मोहरीचे तेल घेऊन ते गरम करा. तसेच त्या तेलाने हलक्या हातांनी मसाज करा. yamule प्रभावित नसांमध्ये योग्य रक्त परिसंचरण आणि वेदना कमी होण्यास मदत होते. पायाला सूज असेपर्यंत तेल गरम करून दिवसातून दोन ते तीन वेळा मसाज करा.
खोबरेल तेल आणि कापूर :
पायांना खाज येत असेल तर खोबरेल तेल गरम करून त्यात कापूर टाका.त्यानंतर जिथे सूज आणि लालसरपणा असेल तिथे हलक्या हातांनी मसाज करा. हे खाज कमी करण्यास देखील मदत करू शकते.
Winter Health Tips l तेल आणि मेणबत्ती :
मोहरीचे तेल गरम करा आणि नंतर त्यात एक मेणबत्ती ठेवा. मेणबत्ती पूर्णपणे वितळेपर्यंत गरम करा. आता ते थंड झाल्यावर सुजलेल्या भागावर हलक्या हाताने मसाज करून लावा. 2 ते 3 वेळा लावल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल.
पीठ :
पिठाच्या उबदारपणामुळे वेदनापासून आराम मिळतो. यासाठी पिठाची पेस्ट बनवून दुखणाऱ्या भागावर 20 ते 30 मिनिटे लावा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा.
News Title : Winter Health Tips
महत्वाच्या बातम्या :
Ram Mandir l राम भक्तांनो हे आहेत देशातील सर्वात मोठी 5 राम मंदिरं
LIC Jeevan Dhara 2 l आयुष्यभर परताव्याची हमी मिळणार! LIC ची नवीन योजना लाँच
Kia Seltos l Kia कंपनीने लाँच केले Seltos चे 5 जबरदस्त मॉडेल! जाणून घ्या फीचर्स
Ram Mandir l घरबसल्या पाहता येणार भक्तांना राम मंदिर सोहळा! पहा कधी आणि कुठे