मुंबई | आयपीएल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. पण अद्यापी प्ले ऑफच्या तीन जागा शिल्लक आहेत. या तीन जागांसाठी आता चार संघांमध्ये जोरदार लढत होत आहे.
शेवटचे सामने खेळवले जात असल्यानं निव्वळ धावगतीच्या आधारावर देखील एखादा संघ बाहेर होण्याची शक्यता आहे. परिणामी संघ आपल्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत.
दिल्ली विरूद्ध पंजाब दरम्यानच्या सामन्यात दिल्लीनं विजय मिळवला आहे. त्यानंतर मात्र गुणतालिकेत मोठा फेरबदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
दिल्ली आणि आरसीबी दोन्हींचे समान गुण झाले आहेत पण निव्वळ धावगतीच्या आधारावर दिल्लीनं आरसीबीला मागं टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे.
गुजरात टायटन्स या स्पर्धेत क्लालिफाई करणारा पहिला संघ ठरला आहे. पण लखनऊ, राजस्थान, दिल्ली, आरसीबी या संघांमध्ये जोरदार लढाई चाललेली आहे.
आरसीबीला प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करायचं असेल तर पुढील सामन्यात मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागेल. किंवा दिल्ली संघ पुढील सामन्यात पराभूत व्हावा लागेल.
आरसीबीला आतापर्यंत एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. दोन्ही वेळेस अंतिम फेरीत जाऊन संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशात यावेळी आरसीबीच्या आशा उंचावलेल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“कारवाई न झाल्यास जशास तसं उत्तर देऊ”; देवेंद्र फडणवीस आक्रमक
“उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण”
“मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही”
“मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”
Weather Update | ‘या’ भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज