लखनऊ | लॉकडाउन काळात, देशातील कामगार आणि मजुरांना चांगलेच हाल सोसावे लागले. केंद्र सरकारने त्यांना प्रवासाची परवानी दिल्यानंतर राज्यातील कामगार रेल्वे, बस मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी परतत आहेत.
घरी परतणाऱ्या या कामगारांची मदत करण्यासाठी समाजातील अनेक व्यक्ती समोर येत आहेत. लॉकडाउन काळात उत्तर प्रदेशात आपल्या घरी अडकलेल्या मोहम्मद शमीने या कामगारांची मदत करण्याचं ठरवलं आहे.
मोहम्मद शमीने आपल्या सहकाऱ्यांसह घराजवळील जागेत मदतकार्याचा मंडप लावलेला आहे. घरी जाणाऱ्या कामगारांना शमी फळं, जेवणाचं पाकीट आणि पाण्याची बाटली अशी मदत करतो आहे. बीसीसीआयनेही मोहम्मद शमीच्या या मदतकार्याचं कौतुक केलं आहे.
लॉकडाउन काळात सर्व क्रिकेट सामने सध्या बंद आहेत. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगामही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज- उद्धव ठाकरे
-‘…तर तोंड बंद ठेवा’; पोलीस अधिकाऱ्याचा डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला
-एटीकेटी, बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचं काय?; उदय सामंत म्हणाले…
-“जनमताशिवाय राजा आणि परीक्षेशिवाय पदवी… अजब तुझे सरकार”
-…म्हणून 48 तासांसाठी रायगड जिल्ह्यात संचारबंदी, पालकमंत्री आदिती तटकरेंची घोषणा