घर सॅनिटाइझ करत होती महिला; अशा धक्कादायक प्रकारे ओढवला मृत्यू

नाशिक | सध्या जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोक सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. मात्र याच सॅनिटायझरमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मेणबत्तीच्या प्रकाशात घर सॅनिटाइझ करताना भडका उडाल्याने नाशिक मधील महिलेचा भाजून मृत्यू झाला आहे.

रझबिया शेख या आपलं घर सॅनिटायझ करत होत्या. मात्र, सॅनिटायझ करतेवेळी अचानक लाईट गेल्याने त्यांनी मेणबत्ती लावली. याच मेणबत्तीच्या प्रकाशात त्या पुन्हा घर सॅनिटायझ करू लागल्या. मात्र, मेणबत्तीमुळे सॅनिटाइझरचा भडका उडाला व त्यामध्ये रझबिया शेख भाजल्या गेल्या, असा दावा केला जात आहे.

नाशिक शहरातील वडाळा या गावात ही घटना घडली आहे. भाजल्यानंतर रझबिया शेख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रझबिया यांचं शरीर 90% भाजलं गेलं होतं. उपचारादरम्यान, 24 जुलै रोजी रझबिया यांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात सॅनिटाइझ करण्याचा सल्ला नागरिकांना दिला जातो. मात्र सॅनिटायझर वापरताना केलेली हलगर्जी जिवावर बेतू शकते याचं उदाहरण समोर आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील दाम्पत्याला मुलबाळ नव्हतं; लॉकडाऊन उठल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

कोरोनाला संपवण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितला अध्यात्मिक उपाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या वस्तूंच्या किंमती ऐकाल तर थक्क व्हाल!

अंगात येतं म्हणून मायलेकाला अघोरी बाबाकडं नेलं; त्यानं जे केलं ते धक्कादायक

सापाचं तो़ंड धरुन जबरदस्ती दुधात बुडवलं, त्यानंतर असा अंगाशी आला ‘हा’ प्रकार!