पुण्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये घडला धक्कादायक प्रकार; महिलेला सुरक्षारक्षकाने…

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आली आहेत. या क्वारंटाईन सेंटर्समधून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. पुण्यातील एका क्वारंटाईन सेंटरमधून सुरक्षारक्षकानेच एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आलं आहे. मात्र, येथील सुरक्षारक्षकानेच 27 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आल्याने या सेंटरच्या सुरक्षेबाबतीत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित व्यक्तीने आपण सुरक्षारक्षक असल्याचं सांगून पीडित महिलेचा मोबाईल नंबर घेतला.

त्यानंतर रात्री एकच्या सुमारास त्याने पीडित महिलेला मिस कॉल देण्यास सुरुवात केली. त्याबरोबरच तिला अश्लील शब्दात मेसेज टाकून त्रास देवू लागला. आरोपीने रात्रभर महिला थांबलेल्या खोलीचा दरवाजा ही ठोठावला.

पीडित महिलेने आरोपी लोकेश मते याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, बऱ्याच क्वारंटाईन सेंटर्समधून अश्या घटना समोर येऊ लागल्यामुळे क्वारंटाईन सेंटर्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! पुणेकरांनो सावध व्हा, पुण्याने गाठलेला हा आकडा आहे धक्कादायक!

नालायक पाकिस्तान!; भारत-चीन वादाचा फायदा घेत अशाप्रकारे करतोय कुरापती!

अण्णा हजारे पुन्हा उतरले मैदानात; महाविकास आघाडी सरकारला दिला ‘हा’ इशारा

संतापजनक! 11 महिने अल्पवयीन मुलीसोबत जे केलं ते ऐकून काळजाचा थरकाप होईल!

क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती केलं होतं तरुणाला; त्यानं उचललेल्या पावलानं प्रशासन हादरलं!