मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना एका महिलेने धमकावत 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
धमकी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत महिलेला अखेर अ़टक केल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. धनंजय मुंडेंनी पैसे दिले नाहीत तर बलात्काराची तक्रार दाखल करेन, अशी धमकी या महिलेने दिल्यानंतर मुंडेंनी पोलिसात तक्रार नोंदवली होती.
महिलेचं नाव रेणू शर्मा असल्याची माहिती मिळाली आहे. रेणू शर्माने जानेवारीमध्ये बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी प्रकरण पोलिसात देखील गेलं होतं. त्यानंतर रेणू शर्मा यांनी पोलीस तक्रार मागे घेतली होती.
धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्राँच आणि इंदौर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत रेणू शर्माला अटक केली. त्यानंतर त्यांना इंदौरच्या न्यायालयात देखील हजर करण्यात आलं होतं. आता रेणू शर्माला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?”
मोठी बातमी! ईडीचा नवाब मलिकांना झटका, आता…
“केंद्र सरकारनं अख्खा देश उद्योगपतींना विकला”