मुंबई | पाश्चिमात्य देशात कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने आता लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. भारताशेजारील चीनमध्ये देखील कोरोना रूग्णसंख्या वाढल्याचं पहायला मिळत आहे.
भारतात देखील येत्या काळात कोरोना रूग्णसंख्या वाढणार असल्याचे संकेत जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत. अशातच राजधानी दिल्लीत कोरोना रूग्णसंख्या वाढली आहे.
कोरोनामध्ये वास न येणे, ताप, सर्दी, खोकला आणि इतल लक्षणं समोर आली होती. अशातच नुकत्याच झालेल्या संशोधनातून काही भलतीच लक्षणं समोर आली आहेत.ट
महिलांमध्ये प्रामुख्याने केस गळती, कान वाजणे आणि शिट्टी सारखा आवाज येणे यासारखी लक्षणं समोर आली होती. त्यानंतर आता तज्ज्ञांनी सावधानीचा इशारा दिला आहे.
कोरोना झालेल्या रूग्णांना टिनीटसचा सामना करावा लागत आहे. कानात घंटेसारखा आवाज येत असल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. तिसऱ्या लाटेवेळी देखील ही समस्या समोर आली होती.
केसगळतीची समस्या देखील कोरोनाबाधितांमध्ये दिसून आली आहे. महिला आणि पुरूष दोघांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. साधारण तीन महिन्यांपर्यंत ही समस्या दिसून येते.
हात, डोकं आणि त्वचा सुन्न झाल्याचं देखील यावेळी दिसून आलं आहे. बहुतेक जणांमध्ये ही समस्या दिसून आली आहे. तर चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचं देखील समोर आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेला अखेर इंदौरमधून अटक
“जनता उपाशी आणि मंत्री तूपाशी, हीच का तुमची शिवशाही?”
मोठी बातमी! ईडीचा नवाब मलिकांना झटका, आता…