‘महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजे’ – देवेंद्र फडणवीस

राज्यात सध्या पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. पूजा चव्हाणच्या आत्मह.त्येला शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं आहे. भाजपनं या मुद्यावर आक्र.मक पवित्रा उचलला आहे. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण प्रकरणी सरकारवर ह.ल्लाबोल केला आहे.

भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर नि.शाणा साधला आहे. “सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असले पाहिजे. आमची मागणी आहे की, केवळ दबावाचे, गळचेपीचे राजकारण न करता सरकारने आधी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजे.” असं देवेंद्र फडणणीस यांनी महाविकासआघाडी सरकारला सुनावलं आहे.

सरकार दोषींवर कारवाई करीत नाही. पण, आंदोलन करणार्‍या महिलांचेच अ.टकसत्र राबविण्यात सरकारला धन्यता वाटते. भाजपाच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छे.डछा.ड करणार्‍या वि.कृतीवर का.रवाईची तत्परता न दाखविता, केवळ आवाज द.डपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही तीव्र नि.षेध करतो, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजपनं पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणावरून सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरण्याची पूर्ण तयारी केली असून, आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे.

दरम्यान, भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट राठोडांवर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांनी पूजाने ज्या गॅलरीमधून आत्मह.त्या केली त्या गॅलरीच्या पाहणीसाठी त्या स्वत: बोलत होत्या. मात्र संजय राठोड यांच्या समर्थकांनी चित्रा वाघ यांना टार्गेट केलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

‘मला ‘या’ दिवशी एक दिवसाचा मुख्यमंत्री करा’; अभिजीत बिचुकलेंचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

गुडन्यूज! छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार ‘हा’ अभिनेता, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी?’ म्हणत, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर ह.ल्लाबोल

‘अधिवेशनाच्याआधी संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर…’; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा

ध.क्कादायक! लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’तील अभिनेत्रीला भर रस्त्यात मा.रहाण, पाहा व्हिडीओ