खेळ

क्रिकेटपटूंच्या बायका आणि प्रेयसींचा खर्च किती?; ‘सीओए’नं तपशील मागवल्याने खळबळ

नवी दिल्ली : विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय संघाची बीसीसीआयने झाडाझडती करायला सुरवात केली आहे. विजयानंतर कोट्यावधी रुपये देणारी बीसीसीआय पराभवानंतर केलेल्या खर्चाचा हिशेबही मागते. 

बीसीसीआयचं कामकाज पाहणाऱ्या आणि सर्वेच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासक समितीने (सीओए) कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना खेळाडूंच्या पत्नी आणि त्यांच्या प्रेयसींच्या खर्चाची यादी मागितली आहे. 

बीसीसीआयने क्रिकेटपटूंना आपल्या पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यास नकार दिला होता. मात्र काही अटी घातल्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आली. हाच मुद्दा मांडत लोढांनी आपलं मत मांडलं आहे. 

कर्णधार, प्रशिक्षक आणि खेळाडूंनी आपल्या पत्नी प्रेयसीला परदेशी दौऱ्यावर घेऊन जाणं हे हितसंबंधांची बाब आहे. मात्र बीसीसीआयसाठी आपण वेगळे असे नियम बनवले आहेत, असं लोढा यांनी सांगितलं. 

आमच्या सूचना संविधानाच्या चौकटीत आहेत. जर त्याविरुद्ध पावलं उचलली गेली असतील तर लोकपालांनी हस्तक्षेप करायला हवा, असं न्यायमूर्ती लोढांचं म्हणणं आहे. 

सीओएने घेतलेल्या निर्णयामुळं फक्त बीसीसीआयचे अधिकारीच नाही तर लोढा समितीही आश्चर्यचकित झाली आहे. याप्रकरणी आता लोकपाल डी. के. जैन यांनीच निवृत्ती घ्यावी, असं निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांनी म्हणाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-घोडीवरून येणाऱ्यांकडून बैलगाड्याचा प्रश्न सुटणार नाही; आढळरावांचं अमोल कोल्हेंवर टीकास्त्र

-अजित पवार यांच्या बोचऱ्या टीकेला आढळराव पाटलांचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणतात…

-मोटारीवर कव्हर, आत प्रेमीयुगूलाचे चाळे; आजीबाईंच्या एका शंकेनं बिंग फुटलं!

-आई नको म्हणत होती…. मित्र आले अन् घेऊन गेले… पण आता तो कधीच परत येणार नाही!

जागावाटपाबद्दल चंद्रकांत पाटलांनी बोलू नये- संजय राऊत

IMPIMP