नवी दिल्ली | दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसला. आता कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत आहे. असं असलं तरी आता जगावरील टेन्शन काही कमी केल्या होत नाही.
कोरोनानंतर आता रिनो व्हायरसचे (Rhinovirus) रूग्ण आढळण्यास सुरूवात झाली आहे. या व्हायरसची लक्षणं कोरोनासारखीच असल्याने आता संशोधक आणि डाॅक्टर्स चिंतेत असल्याचं दिसतंय.
जगभरात रिनो व्हायरसचे संक्रमण वाढण्यास सुरुवात झाली आहे. ब्रिटनमध्ये या व्हायरसचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्याने आता जगाचं टेन्शन वाढलं आहे.
कोरोना व्हायरसची जी लक्षणं होती त्यातलीच तीन लक्षणं या नव्या व्हायरसमध्ये दिसून येत आहेत. खोकला, चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे, त्याचबरोबर ताप येणं ही लक्षण देखील दिसून आली आहेत.
ब्रिटनच्या आरोग्य विभागाने दोन्ही व्हायरसमधील फरक समजण्यासाठी गाईडलाईन जारी केली आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरी डोकेदुखी, खवखवणं आणि नाक वाहणं असं सुरू असलं तर ही रिनोव्हायरसची लक्षणं असल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, ज्या लोकांना अशा प्रकराची लक्षणं जाणवत आहेत. त्या लोकांनी घरीच राहून उपचार घ्यावेत, असा सल्ला आता ब्रिटेनमध्ये दिला जात आहे. त्यामुऴे आता येत्या काळात नागरिकांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Sharad Pawar: राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार?, शरद पवार म्हणाले…
Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“…तर पवारांची औलाद सांगणार नाही”, अजितदादांनी दंड थोपटले
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात