सॅना मरिन बनल्या जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान!

फिनलंड | 34 वर्षीय सॅना मरिन या जगातील सर्वात तरूण पंतप्रधान होण्याचा बहुमान पटकावणार आहेत. मरिन येत्या आठवड्यात फिनलँड या युरोपीयन देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

शपथविधीनंतर मरिन या फिनलँडच्याच नाही तर जगातील सर्वात तरूण पंतप्रधान असतील. युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होनारूक हे 35 वर्षांचे तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न या 39 वर्षांच्या आहेत. आतापर्यंत होनारूक हे सर्वात तरूण पंतप्रधान तर आर्डर्न या सर्वात तरूण महिला पंतप्रधान होत्या.

मरिन यांचा राजकीय प्रवास हा 2012 ला सुरु झाला. 2015 मध्ये मरिन या खासदारपदी निवडून आल्या होत्या.  मरिन यांच्याकडे आतापर्यंत  वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी होती.

टपाल कामगारांच्या संपामुळे फिनलँडमध्ये वादळ निर्माण झालं होतं. संप हाताळताना झालेल्या चुकांमुळे विद्दमान पंतप्रधान अँटी रिन्ने यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ‘सोशल डेमोक्रॅटिक पक्षातील’ खासदारांनी पक्षश्रेष्ठी सॅना मरिन यांची निवड केली.

महत्वाच्या बातम्या-