चिंताजनक! राज्यात चोवीस तासात 87 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्यात गेल्या चोवीस तासात तब्बल 87 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या 1, 758 वर पोहोचली आहे. 673 पोलीस या आजारातून बरे झाले आहेत. तर 18 पोलिसांचा आजवर मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूच्या या संकट काळात पोलीस प्रशासन हे कोरोनाशी मुकाबला करण्याऱ्या पहिल्या फळीत योद्धे आहेत. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन काम करताना आणि सर्वाधिक रुग्ण संख्या असणाऱ्या प्रतिबंधीत क्षेत्रातही ते आपले कर्तव्य बजावत आहेत. याचाच परिणाम म्हणून अनेकांच्या संपर्कात येत असल्याने पोलिसांनाही मोठ्या प्रणावार कोरोनाची लागण झाल्याचं चित्र आहे.

मुंबई पोलीस दलात आत्तापर्यंत 11 पोलिसांचे करोनाची बाधा होऊन मृत्यू झाले आहेत. तर उर्वरित विविध जिल्ह्यांमध्ये सात पोलिसांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यात दोन, सोलापूरमध्ये दोन पोलिसांचा तर ठाण्यात एका महिला कॉन्स्टेबलचा करोनामुळं बळी गेला आहे.

गावणाऱ्या पोलिसांच्या वारसांना 50 लाखांची मदत राज्य शासनाने यापूर्वीच जाहीर केली आहे. तसेच मृत पोलिसाच्या वारसाला पोलीस दलात नोकरी देण्याची घोषणाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

-‘…तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार’; उद्धव ठाकरेंचा इशारा

-‘एक वेळ माझा गळा चिरा, पण…’; ममता बॅनर्जी आक्रमक

-‘हा संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नका’; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

-‘जो मोदी जी की आरती गावे….’; ‘या’ भाजप मंत्र्याकडून नरेंद्र मोदींची आरती लाँच