मुंबई | संपूर्ण राज्यभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. अशातच आता ओमिक्राॅनने टेन्शन वाढवलं आहे.
रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र आता पलटताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण पहायला मिळत आहे. अशातच आता Omicronचा धोका देखील वाढताना दिसत आहे.
राज्यात ओमायक्रॉनचे 20 नवे रुग्ण सापडले आहेत. यापैकी 6 रुग्ण पुण्यात, मुंबईत 11, सातारा 2 तर अहमदनगरमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता राज्यातल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 108 इतकी झाली आहे.
सध्या ओमिक्राॅन रूग्णसंख्या वाढत असल्याने आता राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात आजपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे.
आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 1410 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली असून 868 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.
दिवसभरात 12 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 8 हजार 426 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण (Active Corona Patient) उपचार घेत आहेत.
आतापर्यंत 66 लाख 54 हजार 755 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 65 लाख 1 हजार 243 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त (Corona Free) होऊन घरी परतले आहे.
दरम्यान, कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे आता सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना नियमांचं पालन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर ज्यांचं लसीकरण पुर्ण झालं नाही त्यांनी देखील जबाबदारीनं वागण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या –
ऐन लग्नसराईत निर्बंध जाहीर! आता लग्नाला फक्त ‘इतक्या’ लोकांनाच परवानगी
राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध
दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…
‘…म्हणून धोनीला मेन्टाॅर केलं’; कोहली-बीसीसीआय वादानंतर नवा खुलासा
रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा