मुंबई | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून जगात कहर माजवला आहे. या महामारीनं नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. कोरोनाच्या आलेल्या दोन्ही लाटेत कोरोनानं जगभरात लाखो लोकांचे बळी घेतले. त्यामुळे सगळीकडे मृत्यूचा तांडवच पहायला मिळाला.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची लाट आटोक्यात आली होती त्यामुळे लाॅकडाऊन शिथिल करण्यात आलं होतं. लाॅकडाऊन शिथिल होताच सगळीकडे पुन्हा गर्दी पहायला मिळाली. कोरोनाचा कहर संपतच होता त्यात पुन्हा या गर्दीमुळे तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली.
कोरोना आटोक्यात येत असतानाच आता पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 1 हजार 94 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करण्यास सांगितलं जात आहे.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती.
भारतामध्ये कोरोनाची कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. या दोन्ही लाटांमध्ये कोट्यावधी लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. सध्या 1 लाख 29 हजार 714 व्यक्ती होम क्वारंटाईन असून 870 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. कारण कोरोनाचे नियम मोडल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यानंतर कोरोनाची संभाव्य लाट येण्याची शक्यता जास्त वाढेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही’; आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य चर्चेत
आता इंस्टाग्राम खर्चिक होणार; मोजावे लागणार ‘इतके’ रूपये
रामदास कदमांचा पत्ता कट? ऑडिओ क्लिप प्रकरण भोवण्याची शक्यता
ठाकरे सरकारचा फडणवीसांना दणका! आता ‘या’ प्रकरणाची चौकशी होणार
मोठी बातमी! शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत राजभवनावर; राजकीय घडामोडींना वेग