वाह रे पठ्ठ्या! पोलिसांनी गाडी उचलून नेल्यानं पुणेकरानं थेट बांधलं स्कूटीचं स्मारक

पुणे | पुणेकरांचे टोमणे तर जगभर प्रसिद्ध आहेत. पुणेकरांच्या टोमण्यांबरोबरच पुणेकरांची बुद्धी कोणत्या पातळीवर विचारू करू शकते याची कोणीच कल्पना करू नये, असं देखील म्हटलं जातं. याच गोष्टीची प्रचिती आता आणखी एका पुणेकराने करून दिली आहे.

वाहतूक पोलिसांनी आपली गाडी उचलून नेल्यानं एका पुणेकराने थेट आपल्या गाडीचं स्मारकच बांधलं आहे. आपल्या बाईकचं स्मारक बांधणाऱ्या या व्यक्तीचं नाव सचिन धनकुडे असं आहे.

कोणत्याही पार्किंगच्या नियमांचं उल्लंघन न करता सचिन यांनी आपली गाडी पार्क केली होती. परंतु वाहतूक पोलिसांनी 15 जून रोजी त्यांची गाडी उचलून नेली. आपली गाडी परत मिळावी म्हणून सचिन धनकुडे यांनी तीन महिने वाहतूक पोलिसांकडे फेऱ्या मारल्या.

तीन महिन्यांनंतर 11 सप्टेंबर रोजी सचिन यांना त्यांची बाईक परत करण्यात आली. या काळात त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. याच गोष्टीचा निषेध म्हणून धनकुडे यांनी थेट आपल्या गाडीचं स्मारक बांधलं आहे.

सचिन धनकुडे हे पौड रास्ता परिसरातील रहिवासी आहेत. त्यांनी कोथरूड डेपोजवळ आपल्या बाईकच्या स्मारक बांधलं आहे. शहरातील राहिवाश्यांना भेडसावणाऱ्या पार्किंग आणि वाहतुकीच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी धनकुडे यांनी हे स्मारक बांधलं आहे.

सध्या सचिन धनकुडे यांनी बांधलेल्या या स्मारकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही लोक सचिन यांनी उचलेलं पाऊल योग्य असल्याचं बोलत आहेत. याबाबत बोलताना सचिन धनकुडे म्हणाले की, पोलिसांनी माझी गाडी नेल्यानंतर मला अनेकदा त्यांच्या ऑफिसला जावं लागलं.

या काळात मी वाहतुकीच्या नियमांचा आणि समस्यांचा अभ्यास केला. ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्याचं मला जाणवलं. ही समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका, वाहतूक पोलीस सर्वांनीच याची दखल घ्यावी. जर प्रशासनाने या समस्येची दखल घेतली नाही तर मी माझ्या गाडीचं स्मारक तसंच ठेवणार आहे, असं देखील धनकुडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

आजीने आजोबांना केलं किस; आजोबांनी जी प्रतिक्रिया दिली ती पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

एका ग्लासामुळे नवरदेवाचं आलं खरं रूप समोर, पाहा व्हिडीओ

लग्न झाल्याच्या खुशीत नवरा-नवरीने केला भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

आपल्या मृत मुलाला सोंडेत घेऊन जातानाचा हत्तीणीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक

पती राज कुंद्रासाठी शिल्पाचा अनोखा नवस, घोड्यावर बसून देवीच्या दर्शनाला