बिहार | आपलं प्रेम मिळवण्यासाठी आजकालचे युवक काहीही करण्यासाठी तयार असतात. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात आला तरी चालेल पण प्रेमींना आपल्या प्रियसीशीच लग्न करायचं असतं. बिहारमधील एका युवकाने आपल्या प्रियसीला मिळवण्यासाठी असच काहीसं तब्बल 12 तास शोले टाईप आंदोलन केलं आहे.
शोले सिनेमा तर आपण सर्वांनी पहिलाच आहे. बसंतीला मिळवण्यासाठी विरु पाण्याच्या टाकीवर चढतो, तो सीन तुम्हाला आठवतंच असेल. असंच आता या युवकाने केलं आहे. बिहारच्या सुपैलमध्ये ही घटना घडली आहे. प्रियसीशी लग्न लावून दिलं जावं म्हणून हा युवक तब्बल 12 तास पाण्याच्या टाकीवर चढून बसला होता.
माहितीनुसार, या प्रियकर तरुणाचं नाव प्रशांत कुमार असं आहे. प्रशांतचं मधूबनी जिल्ह्यातील एका तरुणीवर प्रेम आहे. या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं आहे. प्रियसी आणि प्रियकर लग्नासाठी तयार आहेत. मात्र, प्रियसीचे वडील या लग्नासाठी तयार नाहीत.
प्रशांतने खूप प्रयत्न केले. मात्र, तरीही ते आपल्या मुलीचं प्रशांतशी लग्न लावून देण्यास तयार नव्हते. अखेर प्रशांतने शोले मधील विरुचा मार्ग अवलंबला. प्रशांत शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास गावातील एका हॉस्पिटल शेजारील पाण्याच्या टाकीवर चढला.
टाकीवर चढण्याअगोदर प्रशांतने एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती. रात्रीच्या सुमारास प्रशांत पाण्याच्या टाकीवर चढल्याचं लोकांच्या नजरेस पडताच गावकरी त्या परिसरात जमा झाले. यावेळी प्रशांत आपलं लग्न प्रियसीसोबत लावून देण्याची मागणी करत होता. तसेच प्रियसीशी लग्न लावून न दिल्यास आत्म.हत्या करेल, अशी धमकी देखील देत होता.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी त्याला प्रियसीशी लग्न लावून देण्याचं आश्वासन देखील दिलं. मात्र, प्रेमी अभिषेक काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. प्रियसीला आणि तिच्या वडिलांना तिथे बोलावण्याची मागणी अभिषेक करत होता.
यावेळी फायर ब्रिगेडची गाडी देखील घटनास्थळी दाखल झाली. पण जोपर्यंत प्रियसी आणि तिचे वडील तेथे येत नाहीत तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही, या गोष्टीवर अभिषेक अडून राहिला. संपूर्ण रात्र अभिषेकचा हा हायव्होल्टेज ड्रामा चालला.
अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पोलिसांनी खूप मेहनतीने अभिषेकला खाली उतरवलं. यानंतर सर्व गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. सध्या संपूर्ण परिसरात अभिषेकचीच चर्चा चालू आहे.
महत्वाच्या बातम्या –
जगन्नाथाच्या ‘या’ मंदिराचं कोडं आजवर वैज्ञानिकांना देखील उलगडलं नाही; वाचा सविस्तर
धक्कादायक! दिल्लीत भररस्त्यात पतीने पत्नीला चाकूने भोसकलं; व्हिडीओ व्हायरल