मुंबई | ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं कोरोनामुळे निधन आहे. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.
मुंबईत 17 नोव्हेंबर 1938 साली त्यांचा जन्म झाला होता. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रातून 1958 साली त्यांनी पदवी संपादन केली होती. बँक ऑफ इंडियामध्ये 20 वर्ष त्यांनी नोकरी केली होती.
1955 मध्ये त्यांनी ‘वेडी माणसं’ या एकांकीकेपासून लेखनाचा श्रीगणेशा केला होता. त्यावेळी ते अवघे 16 वर्षांचे होते. ती एकांकीका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती.
दरम्यान, रत्नाकर मतकरी यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. विविध मान्यवर मंडळी त्यांना आदरांजली वाहत आहेत. मतकरी यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राचं खूप मोठं नुकसान झाल्याची भावना साहित्यिक बोलून दाखवत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-केंद्रावर टीका करण्याआधी तुमच्या तिजोरीतून महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगा; चंद्रकांतदादा भडकले
-निर्मलाआक्का, इथं संवेदना अन् माणुसकी व्यक्त होते; आव्हाडांकडून सीतारामन यांचा समाचार
-बारामतीत पुन्हा कोरोनाबाधित रूग्ण आढळला; पाहा ‘मुंबई ते बारामती कोरोना कनेक्शन…!’
-उद्योग क्षेत्रातील संधीचा मराठी तरूणांनी फायदा घ्यावा, सरकार आपल्या पाठीशी- उद्योगमंत्री
-खळबळजनक! गुजरातमध्ये कोरोना रुग्णाचा मृतदेह बस स्टँडवर आढळला