‘या’ भाजप नेत्याने आता तर हद्दच पार केली! ममता बॅनर्जींना शिवी देत म्हणाले…

नवी दिल्ली |  सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. प्रचारादरम्यान अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आता एका भाजप नेत्याने हद्दच पार केली आहे.

पश्चिम बंगाल मधील प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली असताना भाजप नेते दिलीप घोष यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींना शिवीगाळ करत अपशब्द वापरले आहेत. यामुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

जय श्री राम म्हणण्यात ममता बॅनर्जींना काय त्रास होतो का? असा सवाल करत दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींना  शिवीगाळ केली आहे. पश्चिम बंगाल मधील बनगाव येथील जाहीर सभेला ते संबोधित करत होते.

यावेळी दिलीप घोष म्हणाले की, ममता बॅनर्जींच्या रक्तात काय आहे? त्यांना जय श्री राम म्हणण्यात काय अडचण आहे? दिलीप घोष यांनी यावेळी श्री रामासोबत असं वर्तन का केलं जातंय?, असा देखील सवाल उपस्थित केला आहे.

तसेच आम्ही सत्तेत आल्यावर कार्यकर्त्यांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ, असा इशारा देत दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींना शिवीगाळ केली आहे. घोष यांच्या या वक्तव्यानं सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींना शिवीगाळ करत अपशब्द वापरल्यानं भाजपचे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर कारवाई करणार?, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील राजकारणात देखील सध्या अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी सातत्यानं चालूच आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जात होतं. मात्र, या गोष्टीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साफ नकार दिला आहे.

येत्या १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी त्याचं उत्तर दिलं आहे.

माझ्या माहितीप्रमाणे सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांचा रस देशाच्या राजकारणात आहे. त्यांना काही दिवसांपूर्वीच संसदरत्न पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे. प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो यामुळे सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यातील राजकारणात नसून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आहे, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांपुढे मोदी सरकार नमलं; आंदोलकांना दिली ‘ही’ परवानगी!

गाडी घ्यायचा विचार करताय?; भारताच्या ‘या’ सर्वात सुरक्षित गाड्या नक्की पाहा!

कंगनाचं ट्वीटर अकाउंट निलंबित होणार? मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

‘या’ दोन रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा सर्वात कमी धोका!

धक्कादायक! एम्सच्या डॉक्टरांना कोरोना रुग्णांमध्ये आढळली ‘ही’ दोन नवी लक्षणं!