Top news देश राजकारण

‘बिहार प्रचारात मला धमकावत माझ्यावर बला.त्कार…’; ‘या’ अभिनेत्रीचा बड्या नेत्यावर धक्कादायक आरोप!

मुंबई | नुकतंच बिहारच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सर्वच पक्ष संपूर्ण मेहनतीनं निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी प्रचार करत आहेत. बिहार राज्यात सध्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. अनेक बडे बडे नेते आपल्या पक्षाचे उमेदवार निवडणून आणण्यासाठी बिहारमध्ये जात आहेत.

राजकीय नेत्यांबरोबरच चित्रपट सृष्टीतील बडे कलाकार देखील निवडणुकीच्या प्रचाराला आमंत्रित केले जात आहेत. अशातच आता एका अभिनेत्रीने बिहारच्या प्रचारादरम्यान तिला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

अभिनेत्री अमिषा पटेल ही ‘लोकजन शक्ती’ या पक्षाचे उमेद्वार डॉ. प्रकाश चंद्र यांच्या प्रचारासाठी बिहारमध्ये गेली होती. सध्या ती बिहारच्या प्रचार दौऱ्यावरून मुंबईला पुन्हा परतली आहे. मात्र, मुंबईला येताच तिने बिहार मधील प्रचारादरम्यान तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.

प्रकाश चंद्र यांनी बळजबरीने मला प्रचाराच्या गर्दीत पाठवलं. तिथे माझ्यावर बला.त्कारंच झाला असता. बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आलेला अनुभव अतिशय वाईट होता, असं अमिषा पटेलनं म्हटलं आहे.

तसेच हे अतिशय भयानक स्वप्न होतं असं मला वाटत आहे. मी त्यावेळी प्रचंड घाबरले होते. लोकजन शक्तीचे डॉ. प्रकाश चंद्र हा अतिशय वाईट माणूस आहे. याने मला प्रचाराला बोलावून ध.मक्या दिल्या. मला ब्लॅ.कमेल केलं. हा माणूस जर निवडून आला तर तो महिलांशी कसा वागेल, असे धक्कादायक आरोप आमिषाने केले आहेत.

बिहारमध्ये मला बळजबरीने प्रचार करायला लावलं. मी बिहारमध्ये गेले तेव्हा मला सांगण्यात आलं की मला पटण्यात प्रचार करायचा आहे. मात्र, बिहारमध्ये गेल्यावर पटण्यापासून खूप लांब असलेल्या अबोरा या गावात मला प्रचारासाठी नेण्यात आलं, असं अमिषानं म्हटलं आहे.

माझा नियोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर मला आणि माझ्या संपूर्ण टीमला लवकरात लवकर मुंबईला पुन्हा परतायचं होतं. पण तिथल्या लोकजन शक्तीच्या उमेदवारांनी मला एकटं प्रचार करण्यास भाग पाडलं, असाही आरोप अमिषाने केला आहे.

दरम्यान, अमिषा पटेलने केलेला आरोप ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. अमिषाने केलेल्या आरोपानंतर प्रकाश चंद्र यांच्या भवितव्यावर काय परिणाम होणार का?, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवारांचा इशारा? पंकजा मुंडेंचं कौतुक करत पवार म्हणाले…

रियाला सीबीआयचा पुन्हा दणका! सुशांतच्या बहिणींवरील आरोप फेटाळत सीबीआयनं रियाला…

मुंबईच्या ‘या’ खेळाडूनं विराट कोहलीचा माज मोडला; पाहा व्हिडीओ

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांवरून महाराष्ट्र सरकारमध्ये चुरस; ‘ही’ नावं चर्चेत

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा घणाघात! महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा?