‘या’ अभिनेत्रीनं मोराच्या जवळ जाण्याचं धाडस केलं पण चांगलंच अंगलट आलं, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला धडकी भरवणारे असतात तर काही व्हिडीओ आपलं चांगलंच मनोरंजन करणारे असतात. साध्या सोशल मिडियावर असाच एका अभिनेत्रीचा आणि मोराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मोर म्हटलं की सर्वांनाच त्याचं कुतूहल वाटतं. मोराच्या सौंदर्यामुळे पक्षांचा राजा म्हणून आपण त्याला ओळखतो. मोराच्या सौंदर्यामुळे त्याला जवळून पाहण्याची किंवा त्याला स्पर्श करण्याची अनेकांना आवड असते. मात्र, हीच आवड या अभिनेत्रीच्या चांगलीच अंगलट आली आहे.

या अभिनेत्रींचं नाव दिगांगना सूर्यवंशी असं आहे. काही दिवसांपूर्वी दिगांगना बिग बॉसमुळे खूप जास्त चर्चेत होती. बिग बॉस मधील आपल्या खेळीमुळे दिगांगना अनेकांची फेवरेट झाली आहे. मात्र, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तिची चांगलीच फजिती झाल्याचं दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दिगांगना आपल्या आईसोबत एका पार्कमध्ये गेली आहे. त्यांच्या समोरच एक सुंदर मोर आहे. आजूबाजूला अगदी प्रसन्न वातावरण आहे. दिगांगना अतिशय शांतपणे मोराचं सौंदर्य न्याहाळत आहे.

दिगांगना मोराच्या अगदी जवळ असते. मोर देखील अतिशय शांतपणे तिच्या आजूबाजूला फिरत आहे. मात्र, तिचं असं पाहणं मोराला आवडलेलं दिसत नाही. दिगांगना मोराच्या जवळ जात असतानाच अचानक मोर तिच्या अंगावर हल्ला करतो. मोर दिगांगनाचे केस पकडतो.

यामुळे दिगांगना आणि तिची आई खूप घाबरते. दोघीही खूप मोठ्याने किंचाळतात. काही सेकंदात मोर बाजूला होतो. मोराच्या या हल्ल्यात दिगांगनाला कोणतीही गंभीर ईजा होत नाही. मात्र, तिच्या हाताला थोडं खरचटतं.

फोटोग्राफर विराल भयानी याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विरालने हा व्हिडीओ शेअर करताच खूप वेगानं व्हायरल झाला आहे. विरालने व्हिडिओवर मजेशीर कॅप्शन देखील दिला आहे.

दरम्यान, नेटकाऱ्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला 23 हजारांहून अधिक लाईक मिळाल्या आहेत. तुम्ही देखील हा व्हिडीओ नक्की पाहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाच्या बातम्या-

पोलीस पतीला हॉटेलच्या खोलीत प्रियकरासोबत आढळली पत्नी, अन् मग…; व्हिडीओ व्हायरल

‘ही’ तरुणी चक्क नग्नावस्थेत डोंगर सर करते! जाणून घ्या काय आहे कारण?

चेहऱ्या ऐवजी ‘या’ ठिकाणी मास्क लावल्यामुळे महिला होतीय सोशल मीडियावर ट्रोल

जाणून घ्या! तुम्हाला कोरोना होऊन गेलाय की नाही हे कसं…

एक नारी सब पर भारी ! महिलेनं साडीवर केले खतरनाक स्टंट, पाहा…