देसी जुगाड वापरत ‘या’ काकांनी ब्लेडशिवाय केली दाढी, व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल

मुंबई | सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे, जिथे लोक एका रात्रीत प्रसिद्ध मिळवू शकतात. तसेच एका रात्रीत आपली प्रसिद्धी घालवू देखील शकतात. आजपर्यंत अनेक सर्वसामान्यांना सोशल मीडियाने प्रसिद्धी मिळवून देत त्यांचं जीवन पलटवलं आहे. असंच काहीसं सध्या एका काकांसोबत झालं आहे.

दाढी करण्यासाठी सहसा रेझर किंवा ब्लेडचा वापर केला जातो. याप्रकारे दाढी करताना अनेकदा कापतं आणि रक्त देखील येतं. मात्र, असं काही होऊ नये म्हणून एका काकांनी अलगंच शक्कल लढवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील या काकांनी दाढी करण्यासाठी एक नवीन मार्ग शोधून काढला आहे.

दाढी करण्यासाठी या काकांनी जे जुगाड केलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. सोशल मीडियावर सर्वजण या काकांची वाह वाह करत आहेत. एका वृत्त माध्यमाने याबद्दल वृत्त दिलं होतं. यानंतर हे काका सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.

सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या या काकांनी काड्या आणि दोरा यांचा वापर करून दाढी करण्यासाठी एक उपकरण तयार केलं आहे. रेझरप्रमाणे दिसणारं उपकरण त्यांनी तयार केलं आहे. मात्र, रेझर मधील ब्लेडच्या जागी या काकांनी दोऱ्याचा वापर केला आहे.

V आकारात या काकांनी दोन काड्या एकमेकांना जोडल्या आहेत. रेझरप्रमाणे दिसणाऱ्या या उपकरणात त्यांनी ब्लेडच्या जागी दोरा वापरल्याने दाढीचे केस कापले जात आहेत. काकांनी तयार केलेल्या या उपकरणाने एकदम तुळतुळीत दाढी झालेली दिसत आहे.

काकांचं हे जुगाड पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत. तसेच काकांनी हे कसं केलं, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर कमेंट्स करत अनेक लोक काकांना याबद्दल प्रश्न विचारत आहेत.

दरम्यान, देसी जुगाड वापरून दाढी करणाऱ्या या काकांचं नाव अद्याप कोणाला माहीत नाही. तसेच त्यांचा व्हिडीओ कुठे शूट झाला? याबद्दल देखील काहीच माहीत नाही. काकांनी शोधून काढलेलं हे जुगाड सर्वांसाठीच नवीन आहे.

एखाद्या गोष्टीसाठी पर्याय उपलब्ध होत नसतील तर त्यासाठी एखादं जुगाड शोधून काढणं भारतीयांसाठी नवीन नाही. हेच आता या काकांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ नक्की पाहा.

महत्वाच्या बातम्या-

सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला राखी सावंतने सुनावले असे काही की…, पाहा व्हिडीओ

‘ए जानू चल झाडू मार’; शिल्पा आणि राजचा हा…

श्रद्धा कपूरच्या घरात अचानक शिरला गोलिरा अन…;, पाहा…

अभिनेत्री प्राची देसाईनं लग्नाबद्दल केला खुलासा,…

आता माझी सटकली! संतापलेला कुत्रा मालकासमोर गेला अन्…;…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy