सोलापूरचं महापौरपद भाजपकडेच; श्रीकांचना यन्नम यांची महापौरपदी निवड!

सोलापूर | सोलापूर महानगरपालिकेसाठी आज महापौरपदाची निवडणूक झाली. सोलापूरमध्ये भाजपने महापौरपद राखलं आहे. भाजपच्या श्रीकांचना यन्नम महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

श्रीकांचना यन्नम यांनी 51 मतं मिळाली आहेत. तर विरोधातील एमआयएमचे उमेदवार शाहीजदा बानू शेख यांना केवळ आठ मते मिळाली. भाजपच्या 49 नगरसेवकांची श्रीकांचना यन्नम यांना मतं मिळाली आहेत. पण शिवसेना आणि बसपच्या प्रत्येकी नगरसेवकानेही भाजपला मतदान केलं आहे.

सोलापूर महपौरपदावर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी काल दावा केला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र भाजपला महापौरपद कायम ठेवण्यात यश आलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात पद्मशाली समाजाच्या पहिल्या महिला महपौर होण्याचा मान श्रीकांचना यन्नम यांना मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या-