पीडितेला भेटायला जाताना यशोमती ठाकूरांसोबत कार्यकर्त्यांची गर्दी

नागपूर | वर्ध्यातील हिंगणघाट येथे एका तरुणीला जीवंत जाळून मारण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील पीडित तरुणी ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल असून मृत्यूशी झुंज देत आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री यथोमती ठाकूर पीडितेला भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. मात्र, त्यांच्यासोबत त्यांच्या 20-25 कार्यकर्त्यांनी पीडिता दाखल असलेल्या आयसीयू रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.

यशोमती ठाकूर यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी पीडितेला भेटण्यासाठी झुंबड केली होती. आयसीयूमध्ये जाण्यासाठी निवडक डॉक्टर आणि नर्सेस यांनाच परवानगी असताना कार्यकर्त्यांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

आयसीयूमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना डाॅक्टरांनी रोखलं. तेव्हा कुठं कार्यकर्ते बाहेर पडले. मात्र, पीडितेला भेटायला जात असताना इतक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणं कितपत योग्य आहे, असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

दरम्यान, यथोमती ठाकूर यांनी यावर प्रतिकिया दिली आहे. माझ्यासोबत कुणीही आयसीयूमध्ये आलं नाही. पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखलं होतं. शिवाय कार्यकर्त्यांना बाहेर थांबण्याच्या सूचनाही मी दिल्या होत्या. मीही एका मुलीची आई आहे. त्यामुळे पीडित तरुणी लवकरात लवकर बरी व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे कृपया याचं राजकारण करु नका, असं ठाकूर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-महराष्ट्रात पवारांचे राज्य पुन्हा सुरु झाले- माधव भंडारी

-प्रदूषणासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत येताहेत हे दुर्दैव- राजू पाटील

-महिला अत्याचाराची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; राबवणार ‘आंध्र पॅटर्न’!!

-आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही ‘दिशा’ कायदा आणणार; अनिल देशमुखांची घोषणा

-CAA आणि NPR च्या विरोधामागे मतांचं राजकारण; मोदींचा आरोप