मुंबई | पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि अमरावतीतीलच राज्य मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आता बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांच्यात नवे आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहे.
संग्रामपूर नगर पंचायत निवडणूक गाजली ती बच्चू कडू यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील एन्ट्रीमुळे. बुलढान्यातील संग्रामपूर नगर पंचायत निवडणुकीत बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या 17 उमेदवारांना उभे केलेले.
या निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या स्टार मंत्री यशोमती ठाकूर यांची संग्रामपूर येथे एकाच दिवशी प्रचार सभा झाल्या. सकाळी यशोमती ठाकूर यांची तर सायंकाळी बच्चू कडू यांची.
यशोमती ताईंनी आपल्या प्रचार सभेत बच्चू कडू यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, आज आमच्या जिल्ह्यातील भूत या ठिकाणी येणार आहे…!”.
बच्चू कडू यांनी आपल्या प्रचारसभेत या टीकेला उत्तर देताना म्हटलं की , “मी साधं सुध भूत नसून पंचमहाभूतातील एक भूत आहे, जे विकासाचं भूत आहे..!”
बच्चू कडू यांना या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळाली. आज बच्चू कडू यांनी यशोमती ठाकूर यांच्या टीकेला ट्वीट करून उत्तर दिलेलं आहे.
भूत लागल्या प्रमाणे विकास करावा हे आता आम्ही दाखवून देऊ. निवडणूकीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले, जनतेने अनेक दिग्गजांना नाकारुन आम्हाला संधी दिल्या बद्दल धन्यवाद, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीच्या 12 उमेदवार निवडून आले असून काँग्रेसला 4 तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तर भाजपला एकही जागा मिळालेली नाही. मंत्री राजेंद्र शिंगणे आणि संजय कुटे या दोघांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
आठवड्यापासून बेपत्ता डूग्गू कसा सापडला?, वाचा काय घडलं?
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर
तुमच्याजवळ फाटलेल्या नोटा आहेत?, वाचा कशा बदलाल या नोटा?, जाणून घ्या
लसीमुळे तयार झालेली इम्यूनिटी ‘इतक्या’ महिन्यानंतर संपते; अत्यंत महत्वाची माहिती समोर