हैदराबाद | लॉकडाऊनपासून अभिनेता सोनू सूदने मदतकार्याचा जणू वसा घेतल्याप्रमाणे तो सर्वांना मदत करत आहे. लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुरांना बस उपलब्ध करत त्यांना आपल्या राज्यात जाण्यास मदत केली होती. अशातच सोनूने एका भाजी विकणाऱ्या इंजिनिअर मुलीला नोकरीला लावून दिलं आहे. सोनूच्या मदतकार्याचं सोशल माध्यमांवर लोकांनी कौतूक केलं आहे.
लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योगधंदे, व्यापार आणि कंपन्या बंद झाल्या. त्यामुळे काहींच्या नोकऱ्याही गेल्या. अशाचप्रकारे शारदा नावाच्या एका तरूण इंजिनिअर मुलीची नोकरी गेली होती. एका ट्विटर युजरने अभिनेता सोनूला मदतीची मागणी केली. सोनू सूदला ट्विटमध्ये म्हटलं होतं की, सोनू सूद सर नमस्कार, ही शारदा आहे. जी एक इंजिनियर आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे तिची नोकरी गेली आहे. पण नोकरी गेल्यावरही ती खचून गेलेली नाही. तिने घर खर्चासाठी भाजी विक्रिचा व्यवसाय सुरु केला आहे. कृपयाला तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तिची मदत करा.
सोनूने त्या ट्विटर युजरला रिप्लाय देत सांगितलं की, माझ्या अधिकाऱ्यांनी तिची भेट घेतली आहे. तिचा नोकरीसाठी इंटरव्ह्यू घेण्यात आला आहे. तिला जॉब लेटरही पाठवण्यात आलं आहे, असं म्हटलं आहे.
दरम्यान, सोनू सूद हा सध्या एखाद्या देवदूताप्रमाणे गरजूंना मदत करत आहे. आत्ता काही दिवसांमागे सोनूने एका गरीब शेतकऱ्याला शेताच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर घेऊन दिला होता.
My official met her.
Interview done.
Job letter already sent.
Jai hind 🇮🇳🙏 @PravasiRojgar https://t.co/tqbAwXAcYt
— sonu sood (@SonuSood) July 27, 2020
महत्वाच्या बातम्या-
…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरे गरजले
दिलासादायक! पुण्यात जम्बो रुग्णालयं उभारण्याबाबत अजित पवारांनी केली मोठी घोषणा!
चंपा, टरबुज्या म्हटलं तर…; भाजप नेत्यांना ठेवण्यात आलेल्या टोपण नावाने चंद्रकांत पाटील भडकले!
भाजपचा पडद्याआड महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस करण्याचा प्रयत्न सुरू आहे- शरद पवार