‘येस बँक’ निर्बंधमुक्त; 50 हजारांवरील रक्कम काढण्यास मुभा

मुंबई | ‘येस बँके’च्या खातेधारकांवरील निर्बंध आजपासून हटवण्यात येणार आहेत. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ‘येस बँक’ संपूर्ण बँकिंग सेवा पुन्हा सुरु करणार आहे. त्यामुळे खातेधारकांना 50 हजार रुपयांवरील रक्कमही काढता येणार आहे.

पाच मार्च रोजी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने येस बँकेवर निर्बंध आणत 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मज्जाव केला होता.

आतापर्यंत केवळ एक तृतीयांश ग्राहकांनी 50 हजार रुपये काढले आहेत. ‘येस बँके’च्या सर्व सेवा बुधवारी सुरु होतील, अशी माहिती बँकेने पत्रकार परिषद घेऊन दिली

सर्व एटीएममध्ये पुरेशी रोकड असून ग्राहकांना घाबरुन जाण्याची गरज नाही, अशा शब्दात ‘येस बँके’ने आश्वस्त केलं. तसेच आपण देशभरातील आमच्या 1,132 शाखांमध्ये कुठेही जाऊन 19 मार्चपासून बँकिंग व्यवहार करु शकता, असंही बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या-

-राजभवनाच्या भिंतींना वाचाळ तोंड आहे हे मलिक यांनी उघड केलं- शिवसेना

-#corona | गर्दी टाळा नाहीतर…; मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना इशारा

-कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा अनोखा उपक्रम

-कोरोनाचा फटका राज ठाकरेंनाही; मेळावा करावा लागला रद्द

-“सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही मात्र कमी उपस्थितीत काम करण्याबाबत विचार”