“होय, मी मान्य करतो”, अखेर गुणरत्न सदावर्तेंची कोर्टात कबुली

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी संतप्त आंदोलकांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर मोठा राडा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर एसटी आंदोलनाचे नेते गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती.

सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुन्हा सदावर्ते यांचा ताबा घेतला. सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी आज गिरगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी स्वत:ची बाजू न्यायालयात मांडली. न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मी अर्ज केला आहे म्हणून पोलीस माझी कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं सदावर्ते म्हणाले.

मी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो, पण याबाबत कोणीही तक्रार केली नाही. आर्थिक व्यवहार तपासायचे असल्यास पोलीस कोठडीची काय गरज?, असा सवाल देखील सदावर्तेंनी यावेळी विचारलं आहे.

सदावर्ते यांच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.

दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गिरगाव न्यायालयाने सदावर्ते यांना गावदेवी ठाण्यात दाखल केलेल्या गुन्हाप्रकरणी पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

राज ठाकरे नव्हे ‘खाज’ ठाकरे; अमोल मिटकरींनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

“माजी कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवार यांना हे माहिती नाही का?”

“भाजप पक्षाला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे” 

मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती उघड 

आयडिया, एअरटेल सगळ्यांची सुट्टी होणार?, जिओनं आणला धमाकेदार प्लॅन