‘हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते’; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीनी दिली कबुली

मुंबई |  कोरोना काळात अनेक तरूण-तरूणींचे लग्नाचे बार उडले. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता केवळ मोजक्या लोकांनामध्ये हे समारंभ उरकले गेले. तसेच आपल्याला अनेक बॉलिवूड अभिनेता अभिनेत्री यांचं लग्न झाल्याच्या बातम्या ऐकायला येतात. अशातच बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा लग्न बंधनात अडकली असल्याची माहीती समोर आली आहे.

वयाच्या 39 वर्षी पहिल्यांदा नाहीतर दुसऱ्यांना लग्नच्या बंधनात अडकली आहे. 15 फेब्रुवारी रोजी दियाने वैभव रेखीसोबत विवाह केला. लग्नाला फक्त दीड महिनेच झालेले असताना दियाने बेबी बम्पसह फोटो शेअर करत गुड न्यूज दिली. त्यावेळी ती मालदीव्सला होती.

तिने दिल्या बातमीमुळे दिया लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याची चर्चा चांगलीच रंगू लागली होती. तसेच सोशल मीडियावर अनेकांकडून तिला वेगवेगळे प्रश्न देखील विचारण्यात आले. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून, दियानेच या गोष्टीचा खुलासा केला आहे.

एका यूजरने दियाला आभिनंदन, पण प्रोब्लेम हा आहे की तिने महिला पुरोहिताच्या साक्षीने लग्न करून पूर्वग्र मोडण्याचा प्रयत्न केला. मग तिने लग्नाआधीच गरोदर असल्याचं जाहीर केलं नाही? लग्नानंतरच गर्भधारणा ही परंपरा आपण पाळतोय असं नाही का वाटलं? लग्नाआधी महिला गरोदर का राहू शकत नाहीत?, असा सवाल त्या यूजरने विचारला होता.

यावर दियाने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. ती म्हणाली की, पहिलं म्हणजे आम्हाला मूल होणार आहे म्हणून आम्ही लग्न केलं नाही. आम्हाला आयुष्य एकत्र घालवायचं होतं म्हणून आम्ही लग्न करणार होतो. लग्नांची तयारी करत असताना आम्हाला बाळ होणार असल्याचं कळालं. त्यामुळे हे लग्न गर्भधारणेमुळे झालेलं नाही.

वैद्यकीय सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत आम्ही ही बातमी फोडली नाही. ही माझ्या आयुष्यातील सर्वात अत्यानंदाची गोष्टी आहे. मी अनेक वर्ष या गोष्टीची वाट पाहत होते. त्यामुळे ही बातमी वैद्यकीय कारणाव्यतिरीक्त दुसऱ्या कोणत्या करणासाठी लपवण्याचा प्रश्नच येत नाही, असं दिया म्हणाली.

त्याचप्रमाणे दियाने या प्रश्नांना का उत्तर दिली याचेही कारण तिने सांगतिलं आहे.

  1. मूल होणं ही आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे.
  2. या सुंदर प्रवास कधीच लज्जेचा संबंध येता कामा नये.
  3. महिला म्हणून आपण नेहमीच आपल्या आवडी-निवडी लक्षात घ्याव्यात.
  4. सिंगल राहून मुलाचं पालनपोषण करावं की लग्नानंतर, हा सर्वस्वी आपला निर्णय आहे.
  5. काय योग्य आणि काय अयोग्य यांचे पूर्वग्रह समाजाने दूर करावे, असंही दिया म्हणाली आहे.

दरम्यान, दिया मिर्झाचा नवरा इनव्हेस्टमेंट बँकर आहे. तसेच वैभव हा तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे. त्याला त्याच्या आधिच्या पत्नीपासून एक लहान मुलगी देखील आहे. दिया आणि वैभव एकमेकांना 2020मध्ये भेटले असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

नॅशनल क्रश रश्मिका मंदना गुडबायमध्ये बॉलिवूडमधील…

मास्क न घातलेल्या कंगना रणौतला ‘या’ अभिनेत्यानं…

उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खाणं टाळा, नाहीतर होऊ…

पुन्हा एकदा ऐकू येणार ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हा’…

राशीभविष्य: आज ‘या’ राशींच्या लोकांसाठी आहे…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy