मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ईडी विनाकारण त्रास देत असल्यामुळे पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.
उद्याची पत्रकार परिषद मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच होत असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे. उद्या शिवसेना पक्ष बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
माझी उद्याची पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायलाच हवी. त्यांनी ऐकायला हवी, असं म्हणत त्यांनी भाजपला इशारा दिलाय. केंद्रीय तपास यंत्रणांच्या प्रमुखांनी माझी पत्रकार परिषद आवर्जून ऐकायला हवी, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
उद्या शिवसेना हा पक्ष बोलणार नसून उद्या महाराष्ट्र बोलणार असल्याचं राऊत यावेळी म्हणाले. आता हे उपटसुंभे म्हणतील शिवसेना म्हणजे महाराष्ट्र का?, असा सवाल विचारतील असंही राऊत म्हणाले.
त्यावर, होय शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र. शिवसेना हाच 11 कोटी मराठी माणसांचा आवाज आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.
कोणी उठतो केंद्रातून आणि महाराष्ट्राची बदनामी करतो आणि इकडचे भाजपवाले गांडुळासारखे बसून असतात, असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केलीये.
आमच्या रक्तातच धाडस आहे आम्ही गांडूळ नाही आहोत, असा घणाघात देखील त्यांनी केला आहे. कुणी महाराष्ट्रवार उठावं आणि मराठी माणसांवर दमदाट्या कराव्यात, असं होणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र खोटारडेपणा विरुद्ध लढेल आणि नुसता लढणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत हे दाखवून देऊ, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
झोपेत बायकोने केलं असं काही की…, नवऱ्याने लावला डोक्याला हात
“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”
“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका
“राऊतसाहेब अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, हिंमत असेल तर…”