पुणे | आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून पवारांचे अनेक दिग्गज सहकारी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी भाजपात प्रवेश करत आहेत. विधानसभेच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर आऊटगोईंग होत असल्याने आणि काही आठवड्य़ांवर निवडणूक आली असल्याने हे समीकरण सोडवायचं कसं? यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी राष्ट्रवादीची पुण्यात बैठक पार पडत आहे.
शुक्रवारी होत असलेल्या बैठकीत पक्षातलं आऊटगोईंग आणि आगामी विधानसभेचा प्लॅन या दोन्ही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि त्याबरोबरच पक्षाचे अनेक महत्वाचे नेते या बैठकीला हजेरी लावणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसबरोबरचं जागावाटप आणि पक्षाला लागलेल्या गळतीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
ज्येष्ठ नेते सोडून जात असल्याने आगामी निवडणुकांत तरूणांना मोठ्या प्रमाणावर संधी आणि प्राधान्य दिलं जाणार असल्याचं पवार यांनी वारंवार सांगितलं. यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय.
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ ऐतिहासिक चुकीला नेहरूच जबाबदार; भाजपने शेअर केला व्हीडिओ – https://t.co/arFg9qxI8c @BJP4India @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
कलाकारांवर कोणतीही बंधनं नाहीत; जयंत पवारांच्या व्हायरल पत्रानं खळबळ- https://t.co/1tzGDkzUcs #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
देशातील मंदीला भाजपच जबाबदार- संजय राऊत – https://t.co/d4ZoGuLJgS @rautsanjay61 @BJP4India @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019