“मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”

मुंबई | काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक सभेनंतर आज भाजप नेते देवेंद्र फडणवीसांची उत्तर सभार पार पडत आहे.

गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे देेवेंद्र फडणवीसांच्या आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत. सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम… अरे छट. हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा, असं ट्विट करत फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांनी इशारा दिला होता.

फडणवीसांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली असून त्यांनी शिवसेनेला लक्ष केलं आहे. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला ते म्हणत होते, ‘मास्टर सभा’, मात्र संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर समजले की ती ‘लाफ्टर सभा’, असा टोरलाही फडणवीसांनी लगावला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राच्या राज्यात हनुमान चालीसाचे पठण करणे हा राजद्रोह, असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Weather Update | ‘या’ भागात उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा अंदाज

  राज ठाकरेंबाबत भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

  मोठी बातमी! भारतीय बॅडमिंटन संघानं तब्बल 73 वर्षानंतर रचला इतिहास

  “कुणाच्याही वडिलांबद्दल त्यानं मरावं असं कोणी बोलतं का?”; सुप्रिया सुळे संतापल्या

  अभिनेत्री केतकी चितळेला ‘इतक्या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी