कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले चहा

पुणे |  एकवेळ उपाशी राहू पण ग्राहकांच्या आरोग्याशी कधीही खेळणार नाही. कोणाच्या अन्नात विष कालवणं हे आमचे संस्कार नाहीत, असं येवले चहाचे संचालक नवनाथ येवले म्हणाले आहेत. एडीएच्या कारवाईनंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

मेलामाईन किंवा कलर असे घातक पदार्थ चहात टाकून चहा विकण्याची आम्हाला काही एक गरज नाही. येवले अमृततुल्य या ब्रँडला अनेक फ्रँचायजीची मागणी आहे पण आम्ही मात्र आत्तापर्यंत केवळ 220 जणांनाच फ्रँचायजी दिल्या आहेत. यावरून आम्हाला पैशाचा मोह नाही हे तरी किमान सिद्ध होतंय, असं नवानाथ येवले म्हणाले.

आमचं उदिष्ट केवळ फ्रँचायजी वितरित करून पैसे मिळवणं नसून महाराष्ट्रात जास्तीत जास्त उद्योजक तयार करणं हे आहे, असंही येवले म्हणाले. आम्ही आमच्या चहाची गुणवत्ता टिकवतो. केवळ पैसे कमावणं हा आमचा उद्देश नाही, असं ते म्हणाले.

आम्हाला ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मात्र सोशल मीडियातून सध्याच्या युगात बदनामी व्हायला वेळ लागत नसल्याची खंत येवले यांनी व्यक्त केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान मोदी भगवान राम तर अमित शहा हनुमान; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

-गोळी मारा म्हणणाऱ्या अनुराग ठाकुरांना अटक करा; #ArrestAnuragThakur ट्वीटरवर ट्रेंड

-भाजपने नेमलेले 19 साखर कारखान्यांवरचे संचालक हटवले; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-भाजपचे नेतेच गोळी मारा म्हणत असतील तर हे होणारच; प्रियांका गांधींचं टीकास्त्र

-जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांच्या मुखातून शरद पवार तर बोलत नाहीत ना??- आशिष शेलार