योगी सरकारचा तब्बल 16 लाख कर्मचाऱ्यांना झटका; घेतला ‘हा’ निर्णय

लखनऊ | कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट पाहता, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. या कर्मचाऱ्यांना मिळणारे 6 प्रकारचे भत्ते, सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंगळवारी एक आदेशही जारी करण्यात आला.

सरकारने आदेश जारी करत, सीसीए, सचिवालय भत्ता, पीडब्ल्यूडीच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते, उपअभियंत्यांना मिळणारे भत्ते कायमचे बंद केल्याची माहिती आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकारने कर्मचाऱ्यांना धोका दिला आहे, असं कर्मचारी संघटनांनी म्हटलंय.

दरम्यान, गेल्या महिन्यातच योगी सरकारने महागाई भत्ता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार, कर्मचारी आणि पेन्शन धारकांना डीए मळणार नाही. कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2020 पासून जून 2021 पर्यंत महागाई भत्ता मिळणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

-लॉकडाउनमध्ये ‘या’ भाजप आमदाराच्या मुलाची राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

-राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी; आता घरपोच दारु मिळणार, पण…

-‘तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत’; जयंत पाटलांचं नर्सना भावनिक पत्र

-भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला; पंकजा मुंडेंच्या ‘या’ कट्टर समर्थकला विधानपरिषदेची उमेदवारी

-कौतुकास्पद! कर्ज काढून ‘या’ अभिनेत्याने कर्मचाऱ्यांना दिला पुढील सहा महिन्यांचा पगार