एक दिवस ओवैसी देखील हनुमान चालिसा म्हणताना दिसतील- योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येतीये तसतशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वेगात झडतायेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका प्रचारसभेत अरविंद केजरीवाल यांच्यावर तर टीकास्त्र सोडलंच आहे पण त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांना देखील लक्ष्य केलं आहे.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमुळे आता अरविंद केजरीवाल हनुमान चालिसा म्हणत आहे. एक दिवस असा येईल की एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसीदेखील हनुमान चालिसा म्हणताना दिसतील, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नवी दिल्लीत प्रचारसभा पार पडली. यावेळी बोलताना दिल्लीकरांना साद घालत दिल्ली बदलायची असेल तर आम आदमी पक्षाचं सरकार हटवा आणि आमच्या हातात सत्ता द्या. मग बघा विकासाचे वारे किती जोरात वाहतात, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, दिल्लीतल्या पाठीमागच्या निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला होता. आता यंदाच्या निवडणुकीत दिल्ली राखण्याचं आव्हान आपसमोर असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-उद्धवजी, काय तो निर्णय घेऊनच टाका… मी तुमच्या सोबत आहे; नितेश राणेंचं ट्वीट

-आमचा आवाज दाबणं इतकं सोप का आहे?; झायरा वसीमचा मोदींना सवाल

-उद्धवजी, पीडितेचा जीव वाचवा… तिच्यावर चांगल्या रूग्णालयात उपचार करा- चित्रा वाघ

-…अन् राज ठाकरेंनी दिलं संजय मिस्त्रींना मनसेत येण्याचं निमंत्रण!

-उद्धवजी, शिवजयंती साजरी करताना तिथी सोडा आणि तारीख धरा; राष्ट्रवादीचं आवाहन