कॅमेरा चालू असतानाच योगी आदित्यनाथ यांनी पत्रकाराला दिली शिवी?; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना टार्गेट करण्याचा एकंही मुद्दा सोडत नाहीत. अशातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका पत्रकाराला शिवी दिल्याचा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

योगी आदित्यनाथ हे आपल्या तापट स्वभावामुळे खूप जास्त चर्चेत असतात. ते सतत काही न काही तरी वादग्रस्त वक्तव्य करून जातात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये देखील आदित्यनाथ यांना राग अनावर झाल्याने ते शिवी देताना दिसत आहेत.

देशात कोरोना लसीकरण वेगानं सुरू आहे. पीएम नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी देखील कोरोनाची लस घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला होता, याचवेळी त्यांनी एएनआयच्या एका पत्रकाराला शिवी दिली होती.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. योगी आदित्यनाथ कॅमेऱ्यासमोर बोलत असताना एएनआय वृत्तसंस्थेच्या व्हिडीओ पत्रकाराकडून कॅमेरा हलतो. यामुळे ते चांगलेच रागावतात आणि पत्रकाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदित्यनाथ यांच्यावर सर्व स्तरांतून टिका होऊ लागली होती. अनेकांनी या व्हिडिओवरून आदित्यनाथ यांना धारेवर धरलं होतं. तर दुसरीकडे आदित्यनाथ यांना बदनाम करण्यासाठी हा कट रचला असल्याचं काहींचं म्हणणं होतं.

सेवानिवृत्त आयएएस अधिकारी सूर्य प्रताप यांनी देखील हा व्हिडीओ शेअर करत आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. सूर्य प्रताप ट्विट करत म्हणाले की, हा आहे योगी आदित्यनाथ यांचा खरा चेहरा. एएनआयच्या कॅमेरामॅनकडून थोडासा आवाज झाला म्हणून ते त्याला शिवी देत आहेत.

असो एएनआयसोबत असंच व्हायला हवं. देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था जेव्हा सरकारी प्रवक्त्यांपेक्षाही जास्त पुढे पुढे करून चाटूकरिता करते, तेव्हा हे होणं साहजिक आहे, असं ट्विट सूर्य प्रताप यांनी केलं आहे.

दरम्यान, इतरही काही नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला होता. 5 एप्रिलच्या हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-

सेक्स पॉवर वाढवण्याच्या गोळ्या घेणं अंगलट, तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

‘सुशांतसारखं कार्तिकलाही फासावर जाण्यास भाग पाडू…

‘तो’ फोटो शेअर करत कंगना रणौतनं महाराष्ट्रातील…

फक्त 10 मिनिटं भेटशील का?’ चाहत्याच्या प्रश्नावर…

सिनेसृष्टीला मोठा धक्का: प्रेक्षकांना पोट धरुन हसवणाऱ्या…