लखनऊ | देशात सध्या एकच मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुका…(Five State Election result) पाचही राज्यात निवडणुकांचे मतदान पार पडले आहे. एक्झिट पोलही आले (Election Exit Poll) आहेत. आता प्रतीक्षा आहे फक्त निवडणूक निकालाची.
देशातील सर्व एक्झिट पोलच्या निकालांमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार स्थापन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. असं झालं तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इतिहास रचतील.
1950 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये पहिल्यांदाच निवडणुका झाल्या, तेव्हापासून आजपर्यंत राज्यात सलग दुसऱ्यांदा कोणीही मुख्यमंत्री झालेला नाही, ज्याने पहिला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यूपीमध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले आणि योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री केलं तर ते ऐतिहासिक ठरेल.
उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा हाही एक रंजक पैलू आहे की, कोणत्याही पक्षाची सत्ता वारंवार आली तरी त्या पक्षाने आपल्या आधीच्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली नाही.
1950 ते 1967 या काळात राज्यात काँग्रेसचे सरकार होते, पण दरम्यानच्या काळात गोविंद वल्लभ पंतांपासून सुरू झालेली खुर्चीची कहाणी चंद्रभान गुप्तांपर्यंत पोहोचली. मधल्या काळात पक्षाने आणखी तीन मुख्यमंत्री बदलले. म्हणजेच 1950 ते 1967 पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, पण प्रत्येक वेळी मुख्यमंत्री बदलत राहिले. त्यानंतर 1980 ते 1989 या काळात पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं, मात्र या 9 वर्षांत काँग्रेसने 5 मुख्यमंत्री केले.
1997 ते 2002 अशी पाच वर्षे भाजपने पहिल्यांदा उत्तर प्रदेशात यूपीची सत्ता चालवली, पण या पाच वर्षांत भाजपने 3 मुख्यमंत्रीही बदलले. 21 सप्टेंबर 1997 रोजी भाजपने सरकार स्थापन केलं तेव्हा कल्याण सिंह मुख्यमंत्री झाले, त्यानंतर दोन वर्षांनी मुख्यमंत्री बदलून राम प्रकाश गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देण्यात आली.
351 दिवसांनंतर भाजपने रामप्रकाश गुप्ता यांना हटवून राजनाथ सिंह यांना मुख्यमंत्री केलं. त्याचप्रमाणे 3 जून 1995 रोजी मायावती पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या तेव्हा त्यांचे सरकार 18 ऑक्टोबर 1995 पर्यंत टिकलं आणि त्या 137 दिवस मुख्यमंत्री राहिल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?; पी. चिदंबरम यांचं मोठं वक्तव्य
“म्हणजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही”
धक्कादायक! ‘या’ ठिकाणी सापडला Omicron चा नवा व्हेरिएंट
“अजित पवार ऐकत नाहीत पण बडे साहब सब देख रहे है”; फडणवीसांकडून आरोपांची सरबत्ती
“…तर आम्हीही अनिल परबांना बांबू लावण्यास मागे पुढे पाहणार नाही”