लखनऊ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सरकारची पाठ थोपटत विरोधी पक्षावर सडकून टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी नुकतंच ANI ला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय.
काँग्रेसला बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, हे भाऊ-बहीण पुरेसे आहेत, अशी बोचरी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
आज उत्तर प्रदेशात जेवढ्या शांततेत निवडणुका होत आहेत, तेवढ्या शांततेत यापूर्वी कधीही झाल्या नाही. आमच्या सरकारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष देण्यात आलं आहे. राज्याचा होत असलेला विकास विरोधकांना पाहावला जात नाही. यामुळेच ते अर्थहीन बडबड करत आहेत, असंही त्यांनी म्हटलंयय.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आज आहे. यूपीतील 55 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात मतदान सुरू आहे.
गोवा आणि उत्तराखंडच्या सर्व विधानसभा जागासाठी आज मतदान होत आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली, तसेच निवडणुकीचा हा टप्पा सर्वच राजकीय पक्षासाठी महत्वाचा आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘मी आतापर्यंत आक्रमक होतो पण…’; खासदार संभाजीराजेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा
‘आय रिपीट, भाजपचे साडे तीन नेते…’; संजय राऊतांच्या नव्या दाव्याने खळबळ
डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर
राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; एका दिवसात झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान
“महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात”